शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

नुकसानभरपाईचे प्रस्ताव तत्काळ सादर करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:15 IST

अमरावती : जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्यांना मदत मिळण्यासाठी शासनाकडे तत्काळ त्यांचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर ...

अमरावती : जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्यांना मदत मिळण्यासाठी शासनाकडे तत्काळ त्यांचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी अधिकाऱ्यांना दिले. तिवसा तालुक्यातील शिवणगावकडे येणाऱ्या सूर्यगंगा नदीच्या पुरामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी त्यांनी केली.

तिवसा तहसीलदार वैभव फरतारे, उपविभागीय अधिकारी नरेंद्र फुलझेले, गटविकास अधिकारी चेतन जाधव, उपविभागीय कृषी अधिकारी राहुल सातपुते, तिवसा मंडळ कृषी अधिकारी अरुण गजभिये, मार्डी मंडळ कृषी अधिकारी विलास केचे आदी उपस्थित होते.

शिवणगाव येथील पावसाने पडझड झालेल्या घरांची पाहणी त्यांनी यावेळी केली. तेथील २१८ पंचनामे झाले असून, ९०४ हेक्टरवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल असल्याचे वैभव फरतारे यांनी सांगितले. सूर्यगंगा नदीवरील पुलामुळे अतिवृष्टीत अनेकदा गावाशी संपर्क तुटतो. या पुलाची उंची वाढविण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे तत्काळ सादर करण्याचे निर्देश ना. यशोमती ठाकूर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. शहीद गणेश नेमाडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारलेल्या स्मारक परिसराचे सौंदर्यीकरण करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

------------------

भिवापूरच्या पुलाची उंची वाढविण्यासाठी प्रस्ताव सादर करावे

भिवापूर येथे पावसामुळे नाल्याकाठची जमीन खरडली आहे. यावरील १३० हेक्टरवर नुकसान झाल्याची माहिती व अंदाजे १५ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याची माहिती वैभव फरतारे यांनी ना. ठाकूर यांना दिली. एकही पात्र व्यक्ती मदतीपासून वंचित राहू नये, असे निर्देश पालकमंत्री ठाकूर यांनी दिले.

तिवसा तालुक्यातील भिवापूर येथे मुसळधार पावसामुळे धरणातील अतिरिक्त पाणी भिवापूरकडे जाणाऱ्या पुलावरून वाहते. त्यामुळे खचलेल्या या पुलाची उंची वाढविण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश ना. ठाकूर यांनी दिले. यासाठी येणाऱ्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार करावे, असे कार्यकारी अभियंता विभावरी वैद्य यांना सांगितले.

पावसामुळे रस्ते व वाहतूक बंद होऊ नये, तसेच गावाचा संपर्क तुटू नये, यासाठी कुऱ्हा ते बोर्डा मार्गाचे खोलीकरण योग्य पद्धतीने करावे. पावसामुळे विद्युत पुरवठा खंडित होऊ नये, यासाठी या मार्गावरील तीन विद्युत खांबावरील रोहित्राची उंची वाढविण्याचे निर्देश महावितरणचे राजेश पाटील यांना देण्यात आले. मौजा चेनुष्टा व बोर्डा येथे अतिवृष्टीमुळे शेती पिकाचे झाले. त्याची पाहणी ना. ठाकूर यांनी केली. येथील नुकसानीच्या संयुक्त सर्वेक्षणाचे आदेश त्यांनी दिले. त्यानंतर झालेल्या नुकसानीबाबत तपशीलवार नोंदणी करून तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देश ना. ठाकूर यांनी संबंधितांना दिले.