शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
2
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
3
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
4
बाबांसाठी घड्याळ, आईला कानातले पण ते...; अधिकाऱ्याच्या लेकाची काळजात चर्र करणारी गोष्ट
5
भारतीय नवराच हवा! न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर फलक घेऊन उभी राहिली तरुणी
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
7
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
8
टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुपरफास्ट ३००० धावा; विराट दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
9
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
10
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
11
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
12
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
13
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
14
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव
15
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
16
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
18
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
19
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
20
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?

‘ब वर्ग तीर्थक्षेत्राचे प्रस्ताव मंजुरीअभावी अडकलेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:18 IST

अमरावती : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत विविध तालुक्यांतून जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे 'ब' वर्ग तीर्थक्षेत्र स्थळाचा दर्जा ...

अमरावती : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत विविध तालुक्यांतून जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे 'ब' वर्ग तीर्थक्षेत्र स्थळाचा दर्जा व विकासकामांसाठी २४ प्रस्ताव प्राप्त झाले होते. सदर प्रस्ताव बांधकाम विभागाने दर्जा व विकासकामाच्या मान्यतेसाठी ग्रामविकास विभागाकडे सादर केले आहेत. मात्र, गत वर्षभरापासून सर्व प्रस्ताव मान्यतेअभावी मंत्रालयात पडून आहेत. त्यामुळे या प्रस्तावाच्या मंजुरीची झेडपी पदाधिकारी व सदस्यांना प्रतीक्षा लागली आहे.

जिल्ह्यातील चांदूर बाजार, वरूड, नांदगाव खंडेश्र्वर, भातकुली, अमरावती, दर्यापूर, चांदूर रेल्वे आणि धामणगाव रेल्वे या ८ तालुक्यांतील विविध गावांतील तीर्थस्थळांना 'ब' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवा याकरिता झेडपीच्या बांधकाम विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आले होते. त्यानुसार बांधकाम विभागाने ग्रामविकास विभागाकडे सन २०१७ ते २०१९ या कालावधीत जिल्ह्यातील २४ प्रस्ताव ग्रामविकास मंत्रालयात मंजुरीसाठी सादर केले आहेत. परंतु, वर्षभरापासून या प्रस्तावावर निर्णय झालेला नाही. त्यामुळे तीर्थक्षेत्राचे प्रस्ताव मंजूर करावे, अशी मागणी झेडपी सदस्यांकडून होत आहे.

बॉस

अशी आहेत तिर्थक्षेत्राचे प्रस्ताव

अ'ब' वर्ग तीर्थस्थळी विविध कामांसाठी जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील संत गुलाब बाबा महाराज समाधी मंदिर माधान, सुदंरनारायण संस्थान धानोरा पूर्णा, संत गुलाब बाबा संस्थान शिरजगाव बंड, श्रीक्षेत्र शिरजगाव कसबा, तुळसा माता संस्थान घाटलाडकी,वरूड मधील सय्यद शाह जलालुद्दीन बाबा दर्गाह आमनेर, वसंत महाराज संस्थान लोणी, श्रीक्षेत्र दादाजी धुनीवाले संस्थान लिंगा, नांदगाव खंडेश्र्वरमधील श्रीक्षेत्र सुरेशबाबा संस्थान फुबगाव, महादेव संस्थान काजना, विठ्ठल रूख्मिणी मंदिर शेलुगुंड, अमृत महाराज देवस्थान सार्सी कोठोडा, भातकुलीमधील महालक्ष्मी संस्थान गणोजा देवी, अमरावतीमधील भद्रा मारोती संस्थान अलीयाबाद, तपोनेश्र्वर संस्थान बोडणा, दर्यापूरमधील वियोगी महाराज संस्थान उमरी इतबारपूर, चांदूर रेल्वेमधील श्रीक्षेत्र त्रिवेणी संगम सावंगी, संत एकनाथ महाराज संस्थान आमला, बेंडोजी बाबा संस्थान घुईखेड, नागदेव संस्थान भिलखेड, अवधूत महाराज संस्थान कारला, खप्ती महाराज संस्थान बागापूर, नागमंदिर संस्थान चांदूरवाडी गव्हाळा आणि धामनगाव रेल्वेमधील श्रीक्षेत्र भिकुजी महाराज संस्था आष्टा या तीर्थक्षेत्राचा समावेश आहे.

कोट

ब' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा व विकासकामांसाठी २४ प्रस्ताव सादर केले आहेत. या प्रस्तावांना ग्रामविकास विभागाने मान्यता देवून ब वर्ग तिर्थक्षेत्राचा प्रलंबीत प्रश्न निकाली काढावा

सुहासिनी ढेपे

सदस्या

जिल्हा परिषद