शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

तीर्थक्षेत्रांच्या कामांचे प्रस्ताव द्या आवश्यक निधी मिळवून देऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2021 05:00 IST

जिल्ह्यातील श्रीक्षेत्र रिद्ध्पूर, श्रीक्षेत्र कपिलेश्वर देवस्थान ऊर्फ महादेव संस्थान (गव्हाणकुंड), श्रीक्षेत्र मुदगलेश्वर भारती महाराज संस्थान (अंबाडा, ता. मोर्शी), श्रीक्षेत्र यशवंत महाराज संस्थान (मुसळखेड, ता. वरूड), मारुती महाराज संस्थान (जहागीरपूर, ता. तिवसा) या तीर्थक्षेत्रस्थळी आवश्यक कामांचे प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. त्या म्हणाल्या, आवश्यक कामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. 

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : तीर्थक्षेत्र व महत्त्वाच्या स्थळांचे स्वतंत्र विकास आराखडे तयार करून विविध सुविधांच्या उभारणीतून पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न होत आहे. त्यानुसार जिल्ह्यातील महत्त्वाच्या तीर्थस्थळी आवश्यक कामांचे परिपूर्ण प्रस्ताव शासनाला सादर करावेत. या कामांसाठी आवश्यक निधी मिळवून देऊ, अशी ग्वाही पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी रविवारी येथे दिली.जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र विकासाबाबत आढावा बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झूम प्रणालीद्वारे घेण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या. महसूल, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.जिल्ह्यातील श्रीक्षेत्र रिद्ध्पूर, श्रीक्षेत्र कपिलेश्वर देवस्थान ऊर्फ महादेव संस्थान (गव्हाणकुंड), श्रीक्षेत्र मुदगलेश्वर भारती महाराज संस्थान (अंबाडा, ता. मोर्शी), श्रीक्षेत्र यशवंत महाराज संस्थान (मुसळखेड, ता. वरूड), मारुती महाराज संस्थान (जहागीरपूर, ता. तिवसा) या तीर्थक्षेत्रस्थळी आवश्यक कामांचे प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. त्या म्हणाल्या, आवश्यक कामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. तिवसा तालुक्यातील गुरुकुंज मोझरी व कौंडण्यपूर विकास आराखड्यात अनेक महत्त्वपूर्ण कामे व सुविधांचे नियोजन करण्यात आले आहे. अनेक कामांची पूर्तताही झाली आहे. त्याचप्रमाणे इतर तीर्थक्षेत्र स्थळांवरही विविध सुविधांची उभारणी करण्याचे नियोजन आहे. त्यानुसार आवश्यक प्रस्ताव द्यावेत. विहित मुदतीत ही कामे पूर्णत्वास जाणे आवश्यक आहे. त्यानुसार गतीने कार्यवाही करण्याचे निर्देश पालकमंत्री ठाकूर यांनी दिले.

 

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूर