शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विद्यापीठात नवीन आठ महाविद्यालयांचे प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 12:17 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अधिष्ठाता मंडळाने नवीन आठ महाविद्यालयांना मान्यता प्रदान केली आहे.

ठळक मुद्देअधिष्ठाता मंडळाची मान्यताशासनाच्या अंतिम मान्यतेसाठी पाठविले

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत नवीन आठ महाविद्यालयांच्या प्रस्तावांना अधिष्ठाता मंडळाने मान्यता प्रदान केली आहे. आता राज्य शासनाच्या अंतिम मान्यतेसाठी ते प्रस्ताव विद्यापीठातून पाठविले जाणार आहेत. हल्ली विद्यापीठाशी संलग्न ३९४ महाविद्यालये आहेत.सन २०१९-२०२० या शैक्षणिक वर्षात नवीन महाविद्यालये सुरू करण्यासाठी शासनादेश क्रमांक मान्यता ३१ जानेवारी २०१९ नुसार १३ सप्टेंबर २०१९ रोजीच्या इरादा पत्रानुसार शासन निर्णय क्रमांक एनजीसी- २०१७ अन्वये १५ सप्टेंबर २०१७ नुसार संस्थांकडून महाविद्यालयांचे प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी विद्यापीठाकडे प्राप्त झाले होते. त्याअनुषंगाने विद्यापीठाच्या अधिष्ठाता मंडळाने नवीन आठ महाविद्यालयांना मान्यता प्रदान केली आहे.

यात बुलडाणा जिल्ह्यातील डोंगर खंडाळा येथे श्रीमती बसंतीबाई देवकिशनजी चांडक सहकार कला व वाणिज्य महाविद्यालय, सिंदखेड राजा येथे उत्कर्ष कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, यवतमाळ येथे तक्षशीला कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोला जिल्ह्यात अकोट येथे श्री. सरस्वती कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकरशा येथे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, यवतमाळ जिल्ह्यातील ढाणकी येथे शामबाई नाईक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, यवतमाळ जिल्हा आर्णी तालुक्यातील जवळा येथे स्व. भारतसिंह ठाकूर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अमरावती जिल्ह्याच्या अचलपूर तालुक्यातील पथ्रोट येथे डॉ. एम. एस. गोरडे विज्ञान महाविद्यालयांचा समावेश आहे. शासनाच्या उच्च व शिक्षण विभागाकडून मान्यताप्राप्त झाल्यानंतर हे आठही महाविद्याललये सुरू होतील, असे संकेत आहेत.अभियांत्रिकी महाविद्यालयांना ‘ना’अमरावती विद्यापीठ अंतर्गत नव्याने आठ महाविद्यालये सुरू करण्याबाबतच्या प्रस्तावात कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयांचा समावेश आहे. यात एकही प्रस्ताव अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याबाबत नाही, हे स्पष्ट होते. अमरावती विद्यापीठ संलग्न २६ अभियांत्रिकी महाविद्यालये असून, यातील काही महाविद्यालयांच्या शाखा बंद केल्या आहेत. अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्याचा कल विद्यार्थ्यांमध्ये कमी होत चालल्याचे प्रवेशाच्या संख्येवरून दिसून येत आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र