शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

पाया बांधकामासाठी प्रकल्पग्रस्तांना निधी

By admin | Updated: February 5, 2016 00:21 IST

निम्नपेढी प्रकल्पमधील अळणगाव येथील ग्रामस्थांना पुनर्वसित गावठाणात घराच्या पायाबांधणीसाठी कमीतकमी १ लाखाहून अधिकचा अतिरिक्त निधी मिळणार आहे.

संयुक्त बैठकीतील निर्णय : अळणगाव ग्रामस्थांना होणार लाभ अमरावती : निम्नपेढी प्रकल्पमधील अळणगाव येथील ग्रामस्थांना पुनर्वसित गावठाणात घराच्या पायाबांधणीसाठी कमीतकमी १ लाखाहून अधिकचा अतिरिक्त निधी मिळणार आहे. गुरुवारी यासंदर्भात सिंचन भवनामध्ये पाटबंधारे, भूसंपादन आणि पुनर्वसन यंत्रणेची संयुक्त बैठक झाली. यात हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली. आ.सुनील देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत मुख्य अभियंता लांडेकर, अमरावती प्रकल्प बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राठी, पुनर्वसन या भूसंपादन अधिकारी जयंत देशपांडे यांच्यासह निम्नपेढी, बोरप्रकल्प आणि बोर्डीनाल्या प्रकल्पासंबंधीचे सर्व अधिकारी उपस्थित होते. अळणगाव येथील ग्रामस्थांनी या बैठकीत पुनर्वसन तथा भूसंपादनासोबत घराच्या पायासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला. कठोरा शेतशिवारात शेत असलेल्या अळणगाव येथील ग्रामस्थांच्या पुनर्वसनावेळी घराचा पाया बांधण्यासाठी अतिरिक्त रक्कम देण्यात यावी. येथील संपूर्ण जमीन काळ्या मातीची असून येथे बांधकामासाठी अधिक खोलीचा पाया खोदून बांधकाम करावे लागते. ही रक्कम घरांच्या मोबदल्यासोबत देण्यात यावी, अशी विनंती प्रकल्प अधिकारांकडून करण्यात आली. यावेळी आ. देशमुख यांनी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या सचिवांशी दूरध्वनीवरुन चर्चा करुन हा प्रश्न सोडविण्याची सूचना केली. बरहुकूम घराच्या पाया बांधकामासाठी अतिरिक्त रक्कम मिळण्याचा मार्ग प्रशस्त झाल्याचे या बैठकीदरम्यान सांगण्यात आले. निम्नपेढी प्रकल्पाबाधित असलेल्या अळणगाव येथील ग्रामस्थांना त्यांच्या घराचा मोबदला ८ फेब्रुवारी ते १५ मार्च या कालावीत वितरित करण्यात येणार असल्याची माहिती भूसंपादन तथा पुनर्वसन अधिकारी जयंत देशपांडे यांनी बैठकीदरम्यान दिली. घराच्या पायाबांधकामासाठी अतिरिक्त रक्कम मिळण्याबाबतचा प्रस्ताव अमरावती प्रकल्प बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सु.गो. राठी यांनी सांगितले. बैठकीला अळणगाव येथील सतीश मेटांगे, सुधीर दुर्गे, मंगेश मानकर, पंजाब दुर्गे, किशोर महल्ले, भाऊराव कापडे, रामराव चुडे, बबलू बोडके, अजय माथुरकर, संदीप मेटांगे, अन्नूमियां, आदिचीं उपस्थिती होती. जिल्ह्यातील रखडलेल्या सर्वच प्रकल्पाच्या अडचणींवर या बैठकीत मंथन करण्यात आले. (प्रतिनिधी)