शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील प्रकल्प तहानलेलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 22:13 IST

यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात हवा तसा पाऊस न झाल्याने व धरण परिसरात अपेक्षित पाऊस न पडल्याने ९ जुलैनंतरही जिल्ह्यातील अनेक प्रकल्प हे तहानलेले आहेत. अनेक प्रकल्पांचा आतपर्यंत पाणीसाठा हा ५० टक्क्यांपेक्षा कमी असल्याने चिंता वाढली असून, धरण परिसरात व ज्या नद्यांमुळे धरणाची पातळी वाढते, त्या ठिकाणी दमदार पावसाची प्रतीक्षा नागरिकांना लागली आहे.

ठळक मुद्देधरणातील पाणीसाठा ५० टक्क्यांपेक्षा कमी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात हवा तसा पाऊस न झाल्याने व धरण परिसरात अपेक्षित पाऊस न पडल्याने ९ जुलैनंतरही जिल्ह्यातील अनेक प्रकल्प हे तहानलेले आहेत. अनेक प्रकल्पांचा आतपर्यंत पाणीसाठा हा ५० टक्क्यांपेक्षा कमी असल्याने चिंता वाढली असून, धरण परिसरात व ज्या नद्यांमुळे धरणाची पातळी वाढते, त्या ठिकाणी दमदार पावसाची प्रतीक्षा नागरिकांना लागली आहे.मध्यम प्रकल्पांमध्ये आतापर्यंत शहानूर मध्यम प्रकल्पामध्ये सद्यस्थितीत ३१.३९ टक्के दलघमी उपयुक्त पाणीसाठा हा धरणात शिल्लक आहे, तर चंद्रभागा मध्यम प्रकल्पात ३२.७३ टक्के, पूर्णा प्रकल्पात ३१.३२ टक्के, सपन प्रकल्पात ३१.९४ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. अमरावती शहराची तहान भागविणारा ऊर्ध्व वर्धा प्रकल्पात सद्यस्थितीत ३५ .८५ उपयुक्त पाणीसाठा आहे. त्यामुळे शंभर टक्के धरण भरण्याची प्रशासनाला व नागरिकांना प्रतीक्षा लागली आहे. हीच परिस्थिती विभागातील अनेक जिल्ह्यातील प्रकल्पाची आहे. विदर्भ पाटबंधारे विभागाच्या अधिकृत विवरण पत्रात ६ जुलैपर्यंतची सदर माहिती असून, अप्पर वर्धा धरण परिसरात १ जूनपासून आतापर्यंत २४१.० मिमी पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी १२४.० मिमी पाऊस झाला होता. मागील वर्षीच्या तुलनेत चांगल्या पावसाची नोंद झाली असली तरी दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.९ जुलैपर्यंत मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी थोडा चांगला पाऊस पडला. पण, धरण परिसरात चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. काही दिवसांत जलसाठ्याची पातळी वाढण्याचा विश्वास आहे.- रमेश ढवळेअधीक्षक अभियंता.