शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिष्ठाने बंद, व्यापाऱ्यांनी केला हिंसाचाराचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 01:18 IST

कोरेगाव भीमा प्रकरणाच्या अनुषंगाने अमरावतीत व्यापाऱ्यांनी बुधवारी कडकडीत बंद पाळला. तरीही काही युवकांनी बंद प्रतिष्ठानांवर दगडफेक आणि व्यापाऱ्यांना जबर मारहाण केली. या घटनेचा विविध व्यापारी संघटनांनी गुरुवारी अर्धदिवस दुकाने बंद ठेवून निषेध नोंदविला.

ठळक मुद्देकारवाईची मागणी : जिल्हाधिकारी, सीपी कार्यालयावर दुचाकी मार्च, भरगच्च उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरेगाव भीमा प्रकरणाच्या अनुषंगाने अमरावतीत व्यापाऱ्यांनी बुधवारी कडकडीत बंद पाळला. तरीही काही युवकांनी बंद प्रतिष्ठानांवर दगडफेक आणि व्यापाऱ्यांना जबर मारहाण केली. या घटनेचा विविध व्यापारी संघटनांनी गुरुवारी अर्धदिवस दुकाने बंद ठेवून निषेध नोंदविला.व्यावसायिकांनी जवाहरगेट परिसरातून दुपारी १२ च्या सुमारास दुचाकी मार्च काढला. हा मार्च जिल्हाधिकारी अभिजित बांगर व पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या कार्यालयापर्यंत होता. दोन्ही अधिकाऱ्यांना व्यापाऱ्यांनी निवेदन दिले. व्यापाऱ्यांना करण्यात आलेली मारहाण, दुकानांची केलेली तोडफोड, परिसरात पसरविलेली दहशत याप्रकरणी दोषींवर लवकरात लवकर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यातून करण्यात आली. व्यावसायिकांनी प्रतिष्ठाने दुपारी २ वाजेपर्यंत बंद ठेवली होती. ३ जानेवारी रोजी जवाहर गेट परिसरात बंद प्रतिष्ठानांवर अज्ञातांनी हातात झेंडे घेऊन दगडफेक केली. या प्रकाराला व्यापाऱ्यांनी विरोध केला असता, व्यापाऱ्यांनाच जबर मारहाण केली गेली. दहशत पसरविणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने व्यापारी व परिसरातील नागरिक भयभीत झाले होते. ही सर्व गंभीर बाब लक्षात घेता, या परिसरात उत्पात माजविणाºयांचा शोध घेऊन कठोर कारवाईची आग्रही मागणी केली. सराफा व्यापारी असोसिएशन, सुर्वणकार संघ असोसिएशन, बर्तन व्यापारी असोसिएशन, अनाज व्यापारी असोसिएशन, होलसेल किराणा मर्चंट असोसिएशन, कन्ज्युमर प्रॉडक्ट असोसिएशन, आॅइल इंडस्ट्रीज सराफा व्यापारी असोसिएशन, सक्करस्थ मित्र परिवार, हिंदू हुकरी संघटना, जवाहर मित्र परिवार आदी संघटनांचा यात समावेश होता. निवेदन देताना मुन्ना सेवक, अविनाश चुटके, राजू गायनकर, नगरसेवक प्रवीण हरमकर, विलास इंगोले, गोविंद सोमाणी, सुनील शेटये, किशोर वडनेरकर, राजू घाणड, अजय तिनखेडे, जयेश राजा, गौरीशंकर हेडा, नितेश शर्मा, मनोज खंडेवाल, प्रणित सोनी, मधुकर लढा, विशाल राठी, सचिन करूले, दिलीप काकडे, गणेश गौर, विवेक कलोती, संगीता बुरंगे, सुधीर बोपुलकर, मनोज साखरकर व व्यापाºयांसह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.