शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीत प्राध्यापकाची आत्महत्या; नोट मिळाली, सस्पेन्स कायम!

By प्रदीप भाकरे | Updated: March 20, 2023 18:44 IST

अमरावती - न्यू राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयातील अधिष्टाता प्रा. डॉ. मनीष मोतीसिंह बैस (५२) यांच्या आत्महत्येचे गुढ अद्यापही उलगडलेले ...

अमरावती - न्यू राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयातील अधिष्टाता प्रा. डॉ. मनीष मोतीसिंह बैस (५२) यांच्या आत्महत्येचे गुढ अद्यापही उलगडलेले नाही. याप्रकरणी, गाडगेनगर पोलिसांनी रविवारी उशिरा रात्री आकस्मिक मृत्युची नोंद घेतली. तर घटनास्थळाहून दोन स्वतंत्र पानावर लिहिलेली सुसाईड नोट जप्त केली. त्यातील एक नोट मुलाच्या नावे, तर दुसऱ्या पानावरील मजकूर हा त्यांच्याच कॉलेजमधील एका जेष्ट सहकाऱ्यावर दोषारोपण करणारा असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. सुसाईड नोट जप्तीनंतरही बैस यांच्या आत्महत्येमागील कारण स्पष्ट झालेले नाही.

कॅम्प भागातील वृंदावन कॉलनी येथील घरात बैस यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला होता. रविवारी रात्री ९ च्या सुमारास ती घटना उघड झाल्यानंतर गाडगेनगरचे ठाणेदार आसाराम चोरमले व एसीपी प्रशांत राजे यांनी घटनास्थळ गाठले होते. पंचनामा करून त्यांचा मृतदेह शवविच्छेदनाकरीता पाठविण्यात आला. तर घटनास्थळी आढळलेल्या दोन पानी सुसाईड नोटवरून चौकशीला वेग देण्यात आला. वडिल फोन कॉल रिसिव्ह करीत नसल्याने बैस यांच्या मुंबईला उच्चशिक्षण घेत असलेल्या मुलाने त्याच्या एका स्थानिक मित्राला वृंदावन कॉलनीतील घरी पाठविले होते. तो मित्र पोहोचल्यानंतर प्रा. बैस यांच्या आत्महत्येची घटना उघड झाली होती.काय आहे सुसाईड नोटमध्ये

सीपी नवीनचंद्र रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बैस यांच्या घरातून दोन पानी सुसाईड नोट जप्त करण्यात आली. त्यातील पहिल्या पानावरील मजकुर हा उच्चशिक्षित तरूण मुलाच्या नावे असून, त्यात आपली सर्व संपत्ती त्याच्याच शिक्षणावर खर्च करावी, असे नमूद करत त्याची माफीही मागण्यात आली आहे. तर दुसऱ्या पानावरील मजकुर न्यू राम मेघे कॉलेजमधील बैस यांच्या एका जेष्ट सहकाऱ्याच्या नावे आहे. त्या सहकाऱ्याचा मानसिक त्रास आपल्या सहनशक्तीपलिकडे गेल्याचे बैस यांनी सुसाईड नोटमध्ये नमूद केल्याची माहिती सीपींसह एसीपी प्रशांत राजे यांनी दिली.दोन घरी होते वास्तव्य

पोलिसांनुसार, मनीष बैस यांचे दोन लग्न झाले होते. प्रशांतनगर येथे त्यांच्या दुसऱ्या पत्नीचे घर होते. तर वृंदावन कॉलनीतील घर त्यांच्या स्वमालकीचे होते. त्यांनी रविवारी वृंदावन कॉलनीतील घरी आत्मघात करवून घेतला. कौटुंबिक वाद, आर्थिक व्यवहार व कॉलेजमधील सहकाऱ्याकडून होणारे मानसिक खच्चिकरण अशा वेगवेगळ्या बाबी त्यांच्या सुसाईड नोटमधून उघड झाल्या असल्या तरी खरे कारण त्यांच्या कौटुंबिक सदस्यांच्या बयानानंतर उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती