शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

संत्रा उत्पादकाने विदर्भात सर्वप्रथम उभारले प्रक्रिया केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 23:06 IST

सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या सालबर्डी येथे एका शेतक-याने स्वबळावर संत्रा प्रक्रिया केंद्र व पॅकिंग युनिटची उभारणी केली आहे.

गोपाल डाहाके

मोर्शी (अमरावती)  - सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या सालबर्डी येथे एका शेतक-याने स्वबळावर संत्रा प्रक्रिया केंद्र व पॅकिंग युनिटची उभारणी केली आहे. विदर्भात एखाद्या शेतकºयाने उभारलेले हे बहुदा पहिलेच प्रक्रिया केंद्र आहे. नीलेश सुरेशराव रोडे असे या प्रगतिशील शेतकºयाचे नाव आहे. विषमुक्त संत्रा उत्पादन करताना तो ब्रँडच असावा यासाठी स्वतंत्र पॅकिंग युनिटची गरज होती. फळ जादा काळ टिकण्यासाठी त्यावर वेष्टण लावणे गरजेचे असते. अन्य ठिकाणाहून हे काम करून घेतल्यास कमाईचा मोठा भागा खर्च होणार असल्याने स्वत:चे पॅकिंग युनिट नीलेश रोडे यांनी उभारले. येथे संत्र्यावर प्रोसेसिंग, व्हॅक्सिंग, पॅकिंग होत असते. या युनिटचा लाभ अन्य शेतकºयांनादेखील होणार आहे. विशेष म्हणजे, शासनाची कोणतीही मदत त्यासाठी मिळालेली नाही. 

संत्र्याचा उफराटा प्रवासवरुड, मोर्शी तालुक्यातील संत्री दिल्ली, पंजाब, हरियाणा, बिहार, श्रीनगर, केरळ, ओरिसा आणि बांग्लादेश येथे पाठविली जातात. हा नाशवंत माल असल्याने संत्राउत्पादकांचा कमी, तर हाताळणी करणाºया व्यापाºयांचा घसघशीत फायदा होतो. पंजाबमध्ये आहेत वैयक्तिक प्रक्रिया केंद्रे पंजाबमध्ये संत्र्याला फक्त १० रुपये प्रतिकिलो दर आहे. या परिसरात विदर्भापेक्षा संत्र्याचे सरासरी उत्पादन २५ टक्क्यांनी कमी आहे. तरीदेखील बºयाच शेतकºयांनी वैयक्तिक स्वरूपात संत्रा प्रक्रिया प्रकल्प उभारले आहेत. वरूड-मोर्शी परिसरामध्ये संत्र्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असूनदेखील संत्रा प्रक्रिया केंद्रे नाहीत. सरकारतर्फे शेतकºयांसाठी नियम-अटी शिथिल करून प्रोत्साहन देण्यात यावे. यामुळे जास्तीत जास्त शेतकरी वॅक्सिंग युनिट उभारतील. स्थानिक बाजारपेठ व मुंबईसारख्या शहरात रेल्वे स्थानकावर संत्री विकण्याकरिता जागा उपलब्ध करून देण्यात यावी.     नीलेश रोडे, संत्रा उत्पादक शेतकरी