शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकाद्वारे विहिरीतील गाळ काढण्याची प्रक्रियाच संशयास्पद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 00:31 IST

विहिरीतील गाळ काढताना जीवितहानी होऊ नये, यासाठी महापालिकाद्वारे दोन कोटींचे मल्टियूटिलिटी वाहन खरेदी करण्यात आले. तथापि, शहराची पाणीपातळी खोल गेल्याने आता विहिरींतील गाळ काढण्यासाठी महापालिकाद्वारे निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

ठळक मुद्देमल्टियूटिलिटी वाहन कशासाठी? : अत्याधुनिक वाहन असतानाही निविदा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विहिरीतील गाळ काढताना जीवितहानी होऊ नये, यासाठी महापालिकाद्वारे दोन कोटींचे मल्टियूटिलिटी वाहन खरेदी करण्यात आले. तथापि, शहराची पाणीपातळी खोल गेल्याने आता विहिरींतील गाळ काढण्यासाठी महापालिकाद्वारे निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यामुळे या वाहनाची उपयोगिता काय, असा अमरावतीकरांचा सवाल आहे.विहिरीतील गाळ काढण्याच्या काही प्रकरणांमध्ये विषारी वायूने गुदमरून जीवितहानी झाल्याची घटना दोन वर्षांपूर्वी घडली होती. हा विषय प्रकर्षाने समोर आल्याने महापालिकाद्वारे दोन कोटींहून अधिक किमतीचे मल्टियूटिलिटी रेस्क्यू वाहन दोन वर्षांपूर्वी खरेदी करण्यात आले. सध्या विहिरीतील पाण्याची पातळी खोल गेल्याने गाळ काढण्यासाठी या मल्टियूटिलिटी वाहनाचा उपयोग करून बहुचर्चित व तेवढेच वादग्रस्त ठरलेल्या या वाहनाची उपयोगिता सिद्ध करण्याची नामी संधी महापालिकेला चालून आली आहे. मात्र, कार्यकारी अभियंत्यांनी याविषयी निविदा प्रसिद्ध केल्याने पुन्हा एकदा महापालिकेचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.महापालिकेच्या झोन क्रमांक ५ मधील सार्वजनिक विहिरीमधील गाळ काढण्यासाठी १ लाख ६६ हजार ५७७ रुपयांची निविदा कार्यकारी अभियंत्यांनी प्रसिद्ध केल्याने पुन्हा हा विषय चर्चेत आला. हे वाहन खरेदी करतेवेळी या वाहनाने विहिरीतील गाळ काढता येतो, हे सांगण्यात येवून या बाबतचे प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले होते. त्यामुळे आता निविदा प्रक्रियेचा घाट घालून मजुरांच्या जिवाशी खेळ का चालविला गेला आहे, असा अमरावतीकर प्रश्न उपस्थित करीत आहेत.प्रत्येक आमसभेत वाहन चर्चेतमल्टियूटिलिटी वाहन खरेदीत किमान एक कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करीत महापालिकेच्या बहुतांश सर्वसाधारण सभांमध्ये वस्त्रहरण करण्यात आलेले आहे. अखेर यासंदर्भात १९ जानेवारीच्या आमसभेत आयुक्तांना चौकशी करून पुढच्या आमसभेत अहवाल सभागृहासमोर ठेवण्याचा निर्णय सभापतींनी दिला होता. मात्र, अजूनपर्यंत हा अहवाल सभागृहासमोर आलाच नाही. आता तर आचारसंहिताच आहे. आता गाळ काढण्याच्या निविदेप्रक्रियेमुळे हे वाहन पुन्हा चर्चेत आले आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका