शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
3
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
4
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
5
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
6
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
7
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
8
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
9
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
10
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
11
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
12
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
13
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
14
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
15
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
16
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
17
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
18
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
19
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
20
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस

महापालिका मांडणार राज्यमंत्र्यांसमोर समस्या

By admin | Updated: December 25, 2014 23:26 IST

राज्याचे उद्योग, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्रवीण पोटे व नगरविकास, गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांचा महापालिकेत २७ डिसेंबर रोजी सत्कार आयोजित करण्यात आला आहे.

अमरावती : राज्याचे उद्योग, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्रवीण पोटे व नगरविकास, गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांचा महापालिकेत २७ डिसेंबर रोजी सत्कार आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याच्या आयोजनाचा सर्वसाधारण सभेत ठरावसुद्धा मंजूर केला आहे. मात्र महापालिकेत दोन राज्यमंत्री येत असल्याचे औचित्य साधून अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी समस्यांची यादी मांडण्याची तयारी चालविली आहे.महापालिकेचा कारभार ‘आमदनी अठन्नी, खर्चा रुपया’ असा सुरू आहे. एका अधिकाऱ्याकडे विविध कार्यभार सोपवून आयुक्त डोलारा सांभाळत आहे. एकूण ८०४ पदे रिक्त आहेत. महिन्याकाठी साडेआठ कोटी रुपये कोणतेही विकासकामे न करता महापालिकेला लागते. अशातच शासनाने एलबीटी बंदची घोषणा केल्याने तिजोरीत येणारी रक्कम पूर्णत: ठप्प आहे. उत्पन्नाचे स्त्रोत आटले असून कारभार कसा हाताळावा, या विवंचनेत अधिकारीवर्ग आहे. एकूण २८० कोटी रुपये कंत्राटदार, पुरवठादार, कर्मचाऱ्यांची देणी आहे. अशातच सहावे वेतन आयोग लागू करण्याचे ओझे महापालिकेवर कायम आहे. तिजोरीत ठणठणाट आणि वेतनाची बोंबाबोंब अशा अवस्थेत प्रशासकीय डोलारा सांभाळताना आयुक्तांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मागील दोन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे वेतन थकित असल्याने त्यांनी कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. महापालिकेत एक ना अनेक समस्या उभ्या ठाकल्या असताना अशातच दोन राज्यमंत्र्यांना सत्कारासाठी बोलाविण्यात आले आहे. ही सुवर्ण संधी साधून महापालिकेचा डोलारा व्यवस्थित करण्यासाठी विशेष अनुदान आणि रिक्त पदे भरती करण्याबाबत शासनाने मंजुरी द्यावी, असे निवेदन देण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. समस्या मांडण्यासाठी अधिकारी दोन पावले पुढे सरकत असताना पदाधिकारही मागे नसल्याचे चित्र आहे. महापौर चरणजित कौर नंदा, स्थायी समिती सभापती मिलिंद बांबल, पक्षनेता बबलू शेखावत, गटनेता सुनील काळे, प्रकाश बनसोड, संजय अग्रवाल, अविनाश मार्डीकर, अजय गोंडाणे, विरोधीपक्षनेता दिगंबर डहाके आदी पदाधिकाऱ्यांनी महापालिकेतील समस्यांची यादी तयार करुन ती मंत्र्यांच्या पुढ्यात ठेवण्याची रणनीती आखली आहे. ना. प्रवीण पोटे यांच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दायित्वाची जबाबदारी असून नगरविकास राज्यमंत्री म्हणून रणजित पाटील यांच्याकडे कैफियत मांडण्यासाठी अधिकारी, पदाधिकारी सज्ज झाले आहेत. सत्कार सोहळा आटोपताच एका छोटेखानी बैठकीत समस्यांचा पाढा मंत्र्याच्या पुढ्यात मांडला जाईल. या दोन्ही राज्यमंत्र्यांचा सत्कार महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित करण्यात आला आहे