शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

चांदूर शहराच्या समस्या मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात

By admin | Updated: September 23, 2016 00:16 IST

चांदूररेल्वे शहरातील प्रभाग १ अनेक समस्यांनी ग्रस्त आहे. खडकपुऱ्यातील मुख्य नाला घाण, गाळाने व झुडूपाने बुजले आहे.

ओबीसी घरकुलापासून वंचित : सत्याग्रह युवा मंचचे निवेदन, प्रसाधनगृहाचीही मागणीचांदूररेल्वे : चांदूररेल्वे शहरातील प्रभाग १ अनेक समस्यांनी ग्रस्त आहे. खडकपुऱ्यातील मुख्य नाला घाण, गाळाने व झुडूपाने बुजले आहे. या प्रभागातील पात्र ओबीसींना अद्यापपर्यंत घरकूल मिळालेले नाही. जुना मोटर स्टँड चौक व विरूळ चौकात प्रवासी निवारा त्वरित बांधा. या व अन्य मागण्यांचे निवेदन सत्याग्रह युवा मंचचे अध्यक्ष रूपेश पुडके यांच्या नेतृत्वात नागरिकांनी मुख्याधिकारी यांना दिले. चांदूररेल्वे शहरातील प्रभाग १ दाट लोकवस्ती प्रभाग आहे. शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य नागरिकांचा भरणा जास्त आहे. या प्रभागात खडकपुरा येथून नाला वाहतो. हा नाला घाणीने व गाळाने भरलेला असून अनेक काटेरी झुडपे निघाली आहेत. त्यामुळे तिथे घाणीचे साम्रज्य झाले असून डासांची उत्पत्ती वाढली आहे. त्यामुळे डेंग्यू, मलेरियासह अन्य संसर्गजन्य आजाराचा प्रकोप होऊ शकतो. त्यामुळे या नाल्याची त्वरित स्वच्छता करावी. या प्रभागातील अनेक पात्र ओबीसींना घरकुलाचा लाभ मिळालेला नाही. त्यांना त्वरित घरकूल देण्यात यावे, शहरातील जुना मोटर स्टँड व विरूळ चौकात बस थांबा आहे. परंतु येथे प्रवासी निवारा नसल्याने शेकडोंना उन्ह, वारा, पावसात बसची ताटकळत वाट पाहावी लागते. त्यामुळे या ठिकाणी त्वरीत बस निवारा उभारावा, चांदूररेल्वे तालुक्याचे ठिकाण असून तालुक्यातील अनेक गावकरी विविध कामासाठी दररोज चांदूररेल्वे शहरात येतात. परंतु शहरातील सार्वजनिक शौचालय व प्रसाधनगृह गलिच्छ व घाणीने भरलेले आहेत. ते त्वरित स्वच्छ करण्यात यावेत. चांदूररेल्वे शहरातील रहिवासी असलेल्या अनेक शेतकऱ्यांची शेती ग्रामीण भागात आहेत. अशा शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत जॉबकार्ड मिळालेले नाहीत. त्यांना त्वरित जॉब कार्ड द्यावे या मागणीचे निवेदन सत्याग्रह युवा मंचच्यावतीने चांदूररेल्वे मुख्याधिकारी व आ. वीरेंद्र जगताप यांना देण्यात आले. यापूर्वी अनेकदा या प्रभागातील समस्यांचे निवेदन मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले. मात्र त्यांची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे या समस्या आता तातडीने निकाली काढाव्यात, अशी मागणी शहरातील रहिवाशांनी निवेदनाद्वारे केली. निवेदन देताना सत्याग्रह युवा मंचचे अध्यक्ष रूपेश पुडके, जी. एम. बोरडे, आकाश हारगुडे, एच. ए. पारगांवकर, शुभम इंगळे, अक्षय ठाकुर, स्वप्निल शिंगणजुडे, धिरज कलावटे, पवन कानतोडे, गोपीचंद प्रेमसुरे, नीलेश टाके, अंकुश निमजे, प्रवीण शिवणकर, भीमराव बागडे, अश्विन पाटणे, विजय सातपुते यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)