लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : परिवहन महामंडळाच्या कर्मचाºयांच्या संपामुळे दर्यापूर आगारात खासगी वाहनांना प्रवासी वाहतुकीस मुभा देण्यात आली. येथे रांगेने लागलेल्या खासगी वाहनांमध्ये प्रवासी भरले जात आहेत. शाळांना सुट्या असल्याने स्कूल व्हॅनमधूनही प्रवासी वाहतूक होत आहे.दर्यापूर आगारात ५० एसटी बस आहेत. गेल्या चार दिवसांत एकही बसफेरी आगाराबाहेर पडली नाही. त्यामुळे शासनाने परिपत्रक काढून संपकाळात खासगी वाहनांना थेट आगारातून प्रवासी वाहतूक करण्याचे आदेश दिले. एरवी बस स्थानापासून काही अंतर राखणारी खासगी वाहने आता दर्यापूर आगारात थेट फलाटापुढे लागल्याचे व त्यामध्ये प्रवासी बसत असल्याचे चित्र येथे दिसत आहे. या ठिकाणाहून खासगी बस व स्कूल व्हॅनमधून अमरावती, तर काळीपिवळी वाहनांमधून मूर्तिजापूर, अकोला, अकोट व अंजनगाव मार्गावर प्रवासी वाहतूक केली जात आहे.दरम्यान, कुठलीही अनुचित घटना घडू नये, याकरिता आगारात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
दर्यापूर आगारात खासगी वाहने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 00:46 IST
परिवहन महामंडळाच्या कर्मचाºयांच्या संपामुळे दर्यापूर आगारात खासगी वाहनांना प्रवासी वाहतुकीस मुभा देण्यात आली.
दर्यापूर आगारात खासगी वाहने
ठळक मुद्देसंपाचा परिणाम : स्कूल बसेसचा व्यावसायिक वापर