शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

रात्रीचे काम करण्यासाठी ठेवली खासगी व्यक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 23:44 IST

येथील महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडे विजेसंबंधी तक्रार केल्यावर ‘आम्ही खासगी व्यक्ती रात्रीचे कामे करण्यास नियुक्त केला आहे.

ठळक मुद्देतक्रारीकडे दुर्लक्ष : महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा अजब फंडा

विलास खाजोणेलोकमत न्यूज नेटवर्कब्राम्हणवाडा थडी : येथील महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडे विजेसंबंधी तक्रार केल्यावर ‘आम्ही खासगी व्यक्ती रात्रीचे कामे करण्यास नियुक्त केला आहे. त्यास आम्ही पगारातून पैसे देतो’, असे चमत्कारी उत्तर दिले आहे. यामुळे महावितरणचा कारभार चव्हाट्यावर आला असून तक्रारीची साधी दखलही घेतली जात नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.महाविरतणच्या गलथान कारभारामुळे येथील नागरिक त्रस्त असून कनिष्ठ अभियंता यांचे कर्मचाऱ्यावर कोणत्याच प्रकारचे नियंत्रण नाही. यामुळे तक्रार केल्यास कारवाई होत नाही, तर अधिकाऱ्यांचे आदेश धुडकावून लावण्याचा प्रताप अधिनस्त कर्मचारी करीत आहेत. दुसरीकडे रात्रीच्या वेळी येथे एकही कर्मचारी उपस्थित राहत नाही. ज्या वायरमन व लाईनमनची ड्युटी लागलेली असते ते आम्ही येथे रात्रीला उपस्थित राहत नसतो. विशेष म्हणजे, येथील वायरमनने पवार व राहुल ढगे यांनी ‘आम्ही खासगी व्यक्ती रात्रीचे कामे करण्यास नियुक्त केलेला आहे. त्यास आम्ही पगारातून पैसे देतो’, असे चमत्कारिक उत्तर दिले. यामुळे ब्राह्मणवाडा थडी परिसरातील नागरिकांमध्ये आक्रोश वाढला आहे.ब्राम्हणवाडा थडी परिसरात सुमारे ३० हजार लोकसंख्या असून व ५० टक्के शेतजमीन ओलिताखाली आहे. यामुळे विजेच्या तक्रारींची संख्याही मोठी आहे. गावकऱ्यांच्या विजेच्या तक्रारींचा निपटारा होत नसल्याने गावातील नागरिकांना अंधारात रात्र काढावी लागते. तसेच शेतातील रोहित्राचे काम निघाल्यास कर्मचारी उपलब्ध होईपर्यंत सिंचनापासून वंचित राहावे लागते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावर उत्तर देण्याचे टाळले.आपल्या जागेवर नाईट ड्युटीसाठी कोणत्याही खासगी व्यक्तीची नियुक्ती करता येत नाही. अशा कर्मचाऱ्यास योग्य समज दिली जाईल.- सुधीर वानखडे,उपकार्यकारी अभियंता, चांदूरबाजार