शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

कारागृहात लोकसहभागातून कैद्यांना मिळाला दिलासा

By admin | Updated: September 3, 2016 00:03 IST

न्यायालयाच्या आदेशानुसार कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना किरकोळ कारणांमुळे शिक्षेतून मुक्ती मिळत नाही.

अनिल बोंडेचा पुढाकार : अभिवचन, संचित रजा व सुटकाअमरावती : न्यायालयाच्या आदेशानुसार कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना किरकोळ कारणांमुळे शिक्षेतून मुक्ती मिळत नाही. त्यामुळे ते वैफल्यग्रस्त जीवन जगतात. मात्र आता लोकसहभागातून कैद्यांना दिलासा देण्यासाठी कारागृह प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. याअनुषंगाने शुक्रवारी अभिवचन, संचित व शिक्षा पूर्ण झालेल्या तीन कैद्यांना दिलासा मिळाला आहे.संत गाडगेबाबा प्रार्थना सभागृहात आयोजित कार्यक्रमाला आ. अनिल बोंडे, वसुधा बोंडे, रोटरी क्लब मेनचे अध्यक्ष अशोक आसोरीया, राम ठोंबरे, के. एम. अंबाडेकर, संजय छांगाणी, बालकिशन पांडे, कारागृह अधीक्षक भाईदास ढोले, वरिष्ठ तुंगाधिकारी अशोक जाधव, तुरुंगाधिकारी प्रवीण मोडकर, शरद माळशिखरे, अवेर संस्थेचे अमित सहारकर, वऱ्हाड संस्थेचे धनानंद नागदिवे, प्रमोद मेश्राम, वैद्यकीय अधिकारी संजय गणोरकर, भूषण कांबळे, आर. के. कानडे आदी उपस्थित होते. यावेळी आ.अनिल बोंडे, कारागृह अधीक्षक भाईदास ढोले यांनी कैद्यांशी संवाद साधताना त्यांचे प्रश्न, व्यथा जाणून घेतल्यात. यात कैद्यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षेचा कालावधी पूर्ण केला असताना केवळ दंडाची रक्कम भरली नसल्याने ते कारागृहातून बाहेर जाऊ शकत नाही, या व्यथा मांडल्या. अभिवचन, संचित रजेसाठी पोलीस अहवाल सतत ‘निगेटिव्ह’ येत असल्याने अनेकांना कारागृहातच रहावे लागते. कैदीदेखील अखेर माणूसच आहे. त्याच्या हातून कळत, नकळत चुका झाल्यात. मात्र त्याला मानवाधिकारानुसार जगू द्या, चुका सुधारण्याची संधी देण्याची मागणी बहुतांश कैद्यांनी केली. दरम्यान रोटरी क्लबच्या पुढाकाराने तीन कैद्यांना दिलासा मिळाला. अटी, शर्थीच्या अधीन राहून तीन कैद्यांची दंडात्मक रक्कम भरण्यात आली. यात राजीव धुर्वे याची कायम सुटका करण्यात आली आहे. धुर्वे याची शिक्षा पूर्ण होऊनही त्याच्याकडे अडीच हजार रुपये दंड भरण्याची सोय नसल्यामुळे बाहेर जाऊ शकत नव्हते. मात्र शुक्रवारी अ‍ॅड. अशोक गायकवाड यांनी अडीच हजार रुपये भरुन धुर्वे यांची सुटका करुन माणुसकीचा परिचय दिला. जन्मठेपेचा आरोपी त्र्यंबक भागाजी गायकवाड (७८) याची संचित रजा आणि रवींद्र गणेश बांगर याला अभिवचन रजा मंजूर करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)अर्धांगवायू कैद्याच्या सुटीसाठी धडपडजन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले त्र्यंबक भागाजी गायकवाड (७८, रा. देवळे हातगाव पो. धनसांवगी, जि. जालना) हे येथील मध्यवर्ती कारागृहात १४ डिंसेबर २०१३ रोजी दाखल झाले. मात्र चार महिन्यांपूर्वी त्यांना अर्धांगवायूने ग्रासले. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार झाला. त्यानंतर कारागृहाच्या दवाखान्यात उपचार सुरुच आहे. वयोवृद्ध त्र्यंबकरावांची प्रकृती बघून त्यांना संचित रजा मिळावी, यासाठी कारागृह प्रशासनाने धडपड केली. आ. अनिल बोंडे यांनी पुढाकार घेतला. अटी, शर्थीनुसार त्यांना शुक्रवारी घरी पाठविण्यात आले आहे. ते महिनाभरानंतर कारागृहात परतणार आहेत. कारागृह अधीक्षक भाईदास ढोले यांनी मोलाची कामगिरी केली.