शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

कारागृहात वीज,पाणी बचतीचा संकल्प

By admin | Updated: September 22, 2016 00:24 IST

हातून कळत, नकळत झालेल्या चुकांचे शिक्षेच्या रुपात प्रायश्चित करीत असलेल्या बंदीजनांनी मध्यवर्ती कारागृहात ...

अधीक्षक दालनात बैठक : बराक प्रमुखांनी स्वीकारली जबाबदारीअमरावती : हातून कळत, नकळत झालेल्या चुकांचे शिक्षेच्या रुपात प्रायश्चित करीत असलेल्या बंदीजनांनी मध्यवर्ती कारागृहात आता वीज, पाणी बचतीचा संकल्प सोडला आहे. कारागृह अधीक्षक दालनात झालेल्या बैठकीत सर्व बॅरेक प्रमुखांनी वीज, पाणी बचत करण्याची शपथ घेतली.कारागृह अधीक्षक भाईदास ढोले यांच्या पुढाकाराने कैद्यांसाठी सुधारणा व पुनर्वसन विविध उपक्रम राबविले जात आहे. या उपक्रमांमुळे बंदीजनांच्या जीवनात नवे चैतन्य निर्माण होऊन समाज निर्मितीसाठी काही तरी वेगळे करण्याची उमेद जागे झाले आहे. परिणामी कारागृह अधीक्षकांनी अनावश्यक वीज, पाणी वापर टाळण्यासाठी बंदीजनांनी पुढाकार घ्यावा, असा प्रस्ताव ठेवला असता त्याला उत्स्फू र्त प्रतिसाद मिळाला. बॅरेक अथवा कारागृह परिसरात अनावश्यक वीज, पाणी वापर टाळून राष्ट्रनिर्मितीत सहकार्य करण्याची शपथ बंदीजनांनी घेतली. उर्जा बचतीसाठी बॅरेक जबाबदारांनी स्वत: पुढाकार घेणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. संजय धुर्वे, संतोष नरोटे, अशोक इंगळे, रवि रोकङे,कृष्णा नरोटे, राजू पवार, रमेश गोंडाने, श्रीकृष्ण बंधे, राजू देवडे, सुरेश घुलक्षे, जगदेव मोरे, संजय वर, संजय मोरे, मोतीराम लठाड या बॅरेक प्रमुख तसेच जनरल सुभेदार विक्रम तिवसकर, रक्षक सुरेश गुळवे यांनी उर्जा, पाणी बचतीचा संकल्प घेतला. कारागृह अधीक्षक, वरिष्ठ तुरुंगाधिकाऱ्यांनी आकस्मिक भेट दिली तर बराकीत अनावश्यक वीज, पाणी वापर दिसणार नाही, अशी सामुहिकपणे शपथ घेण्यात आली. या नवीन उपक्रमामुळे कारागृहात ३० टक्के वीज, पाण्याची बचत होईल, असा दावा बॅरेक प्रमुखांनी कारागृह अधीक्षक ढोले यांना दिला. शासन तिजोरीवर पडणारा भार देखील कमी होईल. पर्यावरणाच्या अनुषंगाने वीज, पाणी बचत ही भविष्यासाठी अतिशय आवश्यक बाब असल्याने कारागृहात सुरु झालेल्या या उपक्रमामुळे कारागृह खरेच बंदीशाळा म्हणून नावारुपास येत असल्याचे चित्र आहे.कैद्यांनाही त्यांच्या जबाबदारीचे भान देणारा हा उपक्रम आहे. राष्ट्राच्या प्रगतीकरिता वीज आणि पाण्याची बचत अनिवार्य ठरते. कैद्यांनी वीज आणि पाणी बचतीची शपथ घेतल्याने या उपक्रमाची जोरदार चर्चा होती. कारागृहात हा उपक्रम राबविला जात असल्याने याबद्दल बरीच उत्सुकता आहे. पाण्याचा अनावश्यक वापर व विजेचा अपव्यय टाळल्यास उद्या या नैसर्गिक साधनसंपत्तीसाठी वणवण भटकण्याची वेळ येणार नाही, असा सूर उमटला राष्ट्रनिर्मितीत सगळ्यांचाच सहभाग आवश्यक आहे. वीज, पाणी ही राष्ट्रीय संपत्ती आहे. तिचा वापर योग्य रुपात व्हावा, ही भावना आहे. बंदीजनांना वीज, पाण्याचे महत्त्व पटवून दिले. १४ वॉर्डन, वॉचमन यांच्यावर ११०९ बंदीजन सांभाळण्याची जबाबदारी असताना वीज, पाण्याची बचत देखील करावी लागणार आहे.- भाईदास ढोलेअधीक्षक, मध्यवर्ती कारागृह