शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

महिला रोजगाराला प्राधान्य, दोन कोटींची तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 01:27 IST

शेतकरी विधवा, परित्यक्ता व कुटुंबातून दुरावलेल्या एकल महिलांचे प्रश्न सरकारला कळावेत, वंचित-शोषित या वर्गासाठी शासनाने धोरण ठरवावे, या मुद्द्यावर अमरावती येथे एकल महिला किसान संघटनच्यावतीने रविवारी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देविजया रहाटकर : एकल महिला परिषद, धोरण ठरविण्याची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शेतकरी विधवा, परित्यक्ता व कुटुंबातून दुरावलेल्या एकल महिलांचे प्रश्न सरकारला कळावेत, वंचित-शोषित या वर्गासाठी शासनाने धोरण ठरवावे, या मुद्द्यावर अमरावती येथे एकल महिला किसान संघटनच्यावतीने रविवारी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात आयोजित परिषदेला मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगढ, गोव्यासह मराठवाड्यातील दोन जिल्हे आणि विदर्भातील सात जिल्ह्यांतील एकल महिला उपस्थित होत्या.मुंबई येथील अ‍ॅक्शन एड या संस्थेच्या निरजा भटनाकर व यवतमाळला झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटन वैशाली येडे यांनी परिषदेचे उद्घाटन केले. खासदार नवनीत राणा, आमदार यशोमती ठाकूर, आमदार बच्चू कडू, कमर फातिमा (मध्य प्रदेश), सीमा कुलकर्णी, किसान मित्रच्या डॉ. उपमा दिवाण, अपेक्षा होमिओ सोसायटीच्या डॉ. मधुकर गुबळे, संजीवनी पवार, मारोती चवरे, सुनील धनविजय, दीपाली शर्मा, भावना हस्तक, विलास लोखंडे उपस्थित होते.याप्रसंगी महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी संबोधित केले. राज्यातील ४० लाख महिलांना स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने दोन कोटींची तरतूद केली आहे. येत्या रक्षाबंधनाच्या पर्वावर त्याची अंमलबजावणी होईल, अशी माहिती भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष रहाटकर यांनी दिली.यावेळी आमदार बच्चू कडू व आमदार यशोमती ठाकूर यांनी एकल महिलांच्या गर्दीने खचाखच भरलेल्या सभागृहात महिलांच्या समस्या विधिमंडळात मांडण्याचे आश्वासन दिले. खासदार नवनीत रवि राणा यांनीसुद्धा महिलांना धीर देत संसदेत याबाबत प्रश्न उपस्थित करण्याचे आश्वासन दिले. राज्यातील ४० लाख महिलांचे पती कर्जापायी, आर्थिक संकटाचा सामना करू न शकल्याने मृत्यू पावले. त्यानंतर त्यांच्या परिवाराचा सांभाळ करण्याची संपूर्ण जबाबदारी या अर्धांगिनींवर आपसुकच आली. त्यामुळे विविध संकटांचा सामना करताना महिलांची वाताहत होत असल्याचा सूर परिषदेत निघाला.