रावसाहेब शेखावत यांचे प्रतिपादन : रूख्मिणीनगरात विकास कामांना प्रारंभअमरावती : शहराच्या विकासासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. शहराच्या विकासात आजवर कोणताही पक्षभेद केला नाही. त्यामुळे शहर विकासाकडे वाटचाल करीत असल्याचे प्रतिपादन आ. रावसाहेब शेखावत यांनी केले. रूक्मिणीनगर परिसरातील विविध विकासकामांचा शुभारंभ आ. शेखावत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मराठा फ्रेंड्स क्लबच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष संजय अकर्ते, मराठा फ्रेंड्स क्लबचे अध्यक्ष जगदीश बोंडे, माजी महापौर विलास इंगोले, पक्षनेता बबलू शेखावत, भानुदास भुजाडे, श्याम गुल्हाने, नगरसेवक प्रदीप हिवसे, नगरसेवक नितीन देशमुख, नगरसेविका नूतन भुजाडे आदी उपस्थित होते. रावसाहेब पुढे म्हणाले, शहराच्या विकासासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्यामुळे अधिक निधी आणण्यात यश आले. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनीही भरपूर सहकार्य केले. आ. रावसाहेब शेखावत यांनी मंडळाला निधी दिल्याबद्दल मराठा फ्रेंड्स क्लबचे अध्यक्ष जगदीश बोंडे यांनी त्यांचे आभार मानले. नगरसेवक नितीन देशमुख यांनीही मत व्यक्त केले. त्यानंतर आ. शेखावत यांच्या हस्ते सुयोग मंगल कार्यालय ते महाराष्ट्र बँक आणि भारसाकळे यांच्या घरापासून धवड यांच्या घरापर्यंतचा रस्ता डांबरीकरणाचे भूमिपूजन करण्यात आले. कार्यक्रमाला दीपक फुलझेले, रामकृष्ण जामकर, दादासाहेब पाटील, अण्णा डहाके, पिंटू खोरगडे, वंदना थोरात, अशोक धाबे, सुहास झोड, हेमचंद्र गावंडे आदी उपस्थित होते.
पक्षभेद न ठेवता विकासकामांना प्राधान्य
By admin | Updated: July 27, 2014 23:30 IST