शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
2
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
3
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
5
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
6
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
7
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
8
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
9
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
10
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
11
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
12
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
13
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...
14
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक
15
Bhiwandi Crime: तोंडात कुरकुरे अन् निपचित पडलेला मृतदेह; कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार
16
सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेला शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% वधारला! दिला जातोय खरेदीचा सल्ला
17
Navi Mumbai Crime: इन्स्टाग्रावर ओळख, वाशीमध्ये भेटायला बोलावले; 16 वर्षाच्या मुलीवर कारमध्येच...
18
Kojagiri Purnima 2025:कोजागरी पौर्णिमेला चंद्र प्रकाश अंगावर घ्यावा असे म्हणतात; का ते माहितीय?
19
मुंबई-पुण्यात घरांच्या विक्रीत १७% घट; 'या' कारणांमुळे ग्राहकांनी फिरवली पाठ; किमती कमी होणार का?
20
‘आयुष्मान भारत’ योजना बंद पडली? नागपूरच्या रुग्णालयांमध्ये उघडकीस आले धक्कादायक वास्तव; रुग्णांना सेवा नाकारल्या

आधी संघर्ष उमेदवारीसाठी !

By admin | Updated: November 1, 2016 00:17 IST

महापालिकेची आगामी सार्वत्रिक निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने होत आहे.

महापालिका निवडणूक : इच्छुकांचा हिरमोड अमरावती : महापालिकेची आगामी सार्वत्रिक निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने होत आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभागातच विद्यमान नगरसेवकांसह प्रस्थापितांना इच्छुकांच्या भाऊगर्दीचा सामना करावा लागत आहे. इच्छुकांनी विद्यमान व प्रस्थापितांशी निवडून येण्यापूर्वी उमेदवारी मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागणार असल्याचे चित्र आहे. नवीन प्रभागरचनेनुसार अमरावती महापालिकेत एसआरपीएफ हा एकमेव प्रभाग वगळता सर्व प्रभाग चार सदस्यीय आहेत. यातील आरक्षण घोषित झाल्यामुळे कॉँग्रेसविरुद्ध कॉँग्रेस आणि शिवसेनाविरुद्ध भाजप असा सामना उमेदवाारी मिळविण्याकरिता पहायला मिळणार आहे. विद्यमान सभागृहात काँग्रेसचे २५ नगरसेवक आहेत. काँग्रेसचे प्रदेश महासचिव संजय खोडके यांचे नेतृत्व मान्य करणारे विद्यमान नगरसेवकांसह बरेच इच्छूक काँग्रेसच्या उमेदवारीचे दावेदार आहेत. राजापेठ प्रभागाचे उदाहरण घेतल्यास येथे राकाँफ्रंटचे गट नेते चेतन पवार आणि कॉँग्रेसचे राजू महल्ले हे दोघे ही विद्यमान नगसेवक कॉँग्रेस उमेदवारीचे दावेदार आहेत. अशा बहुतांश ठिकाणी हा टाय येणार असून उमेदवारी जाहीर करताना कॉँग्रेस नेतृत्वाचा कस लागणार आहे. रा.काँ. फ्रंटचे (खोडके गट) विद्यमान ११ नगरसेवक, बहुतांश इच्छूक व काही अपक्षही काँग्रेसकडून रिंगणात उतरणार आहे. त्यामुळे ८७ जागांचे वाटप आणि त्यातही अनेक विद्यमान नगरसेवक उमेदवारीसाठी परस्परांसमोर असताना प्राधान्य कुणाला द्यायचे, असा पेच स्थानिक नेतृत्वाला पडणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये युती झाल्याने या दोन्ही पक्षातील स्थानिकांचे महत्त्व वाढले आहे. काँग्रेस-राकाँ फ्रंटप्रमाणे भाजप-शिवसेनेच्या इच्छुकांमध्येही प्रथम उमेदवारी मिळविण्यासाठीच राजकीय लढाई होणार आहे. राजापेठ प्रभागाचे प्रतिनिधित्व घेतल्यास येथे विद्यमान नगरसेवक प्रशांत वानखडे जसे दावेदार आहेत, तसेच त्याच जागेवरून भाजपाकडून अनिल आसलकर दावेदार असल्याने युतीसमोर राजकीय पेच निर्माण झाल्याची परिस्थिती तूर्तास दिसून येत आहे. (प्रतिनिधी)यांच्यासमोर असणार पेच कॉँग्रेसचे उमेदवार ठरविण्यात संजय खोडके यांच्या सह माजी आ. रावसाहेब शेखावत, महत्त्वपूर्ण भूमिका बनावतील. शहर काँँग्रेसलाही चाचपणी करून उमेदवारी निवडायची आहे. शिवसेनेचे नेतृत्त्व खा. अडसूळ, माजी आ. संजय बंड, प्रशांत वानखडे यांच्याकडे राहील. महानगर प्रमुख सुनील खराटे यांनी उमेदवारांसाठी आवश्यक असलेल्या प्रक्रियाला वेग दिला आहे. भाजपचे नेतृत्व दस्तुर खुद्द पालकमंत्री प्रवीण पोटे, आ. सुनील देशमुख यांच्याकडे असेल. शहराध्यक्ष जयंत डेहनकर यांनी शतप्रतिशत भाजपसाठी तयारी चालवली आहे. हे तीन पक्ष वगळता राष्ट्रवादीत सामसूम आहे. नव्याने शहराध्यक्ष झालेले बाबा राठोड, सुनील वऱ्हाडेंच्या सहकार्याने उमेदवारांची नावे पक्षश्रेष्ठींकडे देवू शकतात. पक्ष एक, इच्छुक अनेक जुन्या दोन किंवा तीन प्रभागांचा एकच प्रभाग झाल्याने इच्छुकांची भाऊगर्दी वाढली आहे. २२ पैकी २१ प्रभागांमध्ये जोग स्टेडियममधील ‘क’ जागा वगळता अन्य ‘क’ अािण ‘ड’ असा ४२ जागा खुला प्रवर्गासाठी आहे. त्यामुळे या ‘क’ आणि ‘ड’ जागांमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी एकवटणार आहे. त्यामुळे विद्यमान नगरसेवकांसह प्रस्थापितांचे धाबे दणाणले आहे. प्रत्येक पक्षातील उमेदवारांची पहिली लढाई आपल्याच पक्षातील इच्छुकांशी होणार आहे. शुभेच्छांच्या पायघड्या चौका-चौकात आणि प्रभागात सर्वदूर दिवाळी शुभेच्छांच्या पायघड्या घेलण्यात आल्या आहेत. अर्थात आपर निवडणूक रिंगणात आहोत, याची वर्दी त्या इच्छुकांनी मतदारांना आगाऊ दिली आहे. अनेक माजी नगरसेवक पाच वर्षांच्या विश्रांतीनंतर फलकावर दिसू लागले अहेत. एकंदरीतच दिवाळीनंतर महापालिका निवडणुकीचा जोर तापण्यास सुरुवात झाली आहे.