शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

साद्राबाडीत भूकंप नसल्याचा प्राथमिक अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 21:53 IST

साद्राबाडी व परिसरातील भूकंपसदृश घटनांबाबत भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्या (जीएसआय) पथकाने केलेल्या पाहणीमध्ये भूकंप नसल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला. तथापि, अधिक तपासासाठी या परिसरात तीन भूस्तर हालचालमापक यंत्रणा कार्यान्वित करण्यात येतील, असे या विभागाचे संचालक मिलिंद धकाते यांनी सांगितले.

ठळक मुद्देजीएसआयचे मिलिंद धकाते यांची माहिती : तीन भूस्तर हालचालमापक यंत्रणा कार्यान्वित करणार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : साद्राबाडी व परिसरातील भूकंपसदृश घटनांबाबत भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्या (जीएसआय) पथकाने केलेल्या पाहणीमध्ये भूकंप नसल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला. तथापि, अधिक तपासासाठी या परिसरात तीन भूस्तर हालचालमापक यंत्रणा कार्यान्वित करण्यात येतील, असे या विभागाचे संचालक मिलिंद धकाते यांनी सांगितले.नागपूर व जबलपूर येथील भूगर्भ निरीक्षण केंद्रात या घटनेची नोंद झालेली नाही. या घटनेत जमीन हलून आवाज येण्याचा प्रकार घडत आहे. साधारणत: जमिनीच्या पोकळीत पाणी भरले गेले की हवा बाहेर येऊन आवाज येण्याच्या घटना घडू शकतात. साद्राबाडी येथे पावसाळ्यात साधारणत: आॅगस्टमध्येच यापूवीर्ही याप्रकारचे आवाज येण्याच्या घटना घडल्या असल्याचे धकाते यांनी सांगितले. भूगर्भातील छोट्या हालचालीचीही नोंद घेऊ शकेल, अशा तीन अतिसंवेदनशील क्षमतेच्या तीन यंत्रणा सोमवारी साद्राबाडी येथे बसविण्यात येतील, जेणेकरून अधिक ठाम निष्कर्षापर्यंत पोहोचता येईल, असे ते म्हणाले. शुक्रवारी उशीरा याबाबतचा खुलासा झाला. यापूर्वी तिवसा तालुक्यातील शेंदूरजना बु. येथेही अशाच प्रकारे जमिनीतून आवाज येण्याचा प्रकार घडला होता.भूगर्भात पाणी मुरल्याने हादरेभूस्तरीय रचनेनुसार हा प्रदेश डेक्कन ट्रॅपमध्ये येतो. डेक्कन ट्रॅपमध्ये जमिनीच्या अंतर्गत थरात पोकळ्या असतात. पावसाचे पाणी शिरून त्यातील हवा बाहेर येऊन आवाज येऊ शकतो व काही हालचालही संभवते. त्याचप्रमाणे, या थरांत चुनखडीचा दगडही असतो. तो पाण्याने भिजला की, त्यातील हवा बाहेर फेकली जाऊन आवाज येऊ शकतो. त्यामुळे ही घटना भूकंप नसल्याचा प्राथमिक अंदाज असला तरी आम्ही आणखी संशोधन करत आहोत. त्यासाठी आवश्यक बाबींचे नमुने घेतल्याचे धकाते म्हणाले.