शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

आधी घेतले विष, मग कापली धमणी, तरीही जिवंतच

By admin | Updated: August 10, 2014 22:44 IST

जीवनभर सोबत राहण्याच्या आणाभाका घेतल्यानंतर मुलीच्या कुटुंबाकडून प्रेमाला विरोध झाला. त्यामुळे प्रेमीयुगुलाने शेतात जाऊन सोबतच विष प्राशन केले. परंतु त्यातूनही मरण येत

बेलोरा : जीवनभर सोबत राहण्याच्या आणाभाका घेतल्यानंतर मुलीच्या कुटुंबाकडून प्रेमाला विरोध झाला. त्यामुळे प्रेमीयुगुलाने शेतात जाऊन सोबतच विष प्राशन केले. परंतु त्यातूनही मरण येत नसल्याचे पाहून दोघांनीही हाताच्या धमण्या कापल्या आणि दुसऱ्या दिवशी आपल्या मित्राला फोन करुन त्याच्याजवळ हकिकत कथन केली. या मित्राने दोघांनाही रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. ही घटना चांदूरबाजार तालुक्यात देऊरवाडा येथे घडली.देऊरवाडा येथील उदय अरुणराव वडनेरकर (२६) व रिया (२०, बदललेले नाव) यांचे अनेक दिवसांपासून प्रेम जडलेले. दोघांनी सोबत राहण्याच्या आणा-भाका घेतल्या. परंतु मुलीच्या घरुन या प्रेमविवाहाला विरोध झाला. त्यामुळे ८ आॅगस्ट रोजी रात्री ८ वाजता मुलगी घराबाहेर पडली. तिने प्रियकर उदयलाही बोलावून घेतले. दोघेही देऊरवाडा येथील एका शेतात गेले. उदयने सोबत विषाची बाटली आणलेली होती. दोघांनीही जीवन संपविण्याचा निर्णय घेऊन विष प्राशन केले. परंतु यातून मरण येत नसल्याचे पाहून दोघांनीही ब्लेडने हाताच्या धमण्या कापल्या. परंतु त्यानंतरही मरण त्यांना शिवत नव्हते. आपल्याला मरण येत नसल्याचे पाहून उदयने ९ आॅगस्ट रोजी सकाळी आपल्या चुलत भावाशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला आणि संपूर्ण हकिकत त्याच्याकडे कथन केली. त्याने घटनास्थळ गाठून या प्रेमीयुगुलाला ग्रामीण रुग्णालय व तेथून अमरावतीला नेले. उपचारानंतर आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.