शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

सायबर गुन्हे टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 00:08 IST

इंटरनेट क्रांती जनतेच्या फायद्याची असली तरी सायबर गुन्हे रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देसायबर जागृती कार्यक्रम : राज्यभरात ट्रान्सफॉर्मिंग महाराष्ट्र प्रकल्पांतर्गत जनजागृती

आॅनलाईन लोकमतअमरावती : इंटरनेट क्रांती जनतेच्या फायद्याची असली तरी सायबर गुन्हे रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे. सायबर गुन्हे टाळण्यासाठी केवळ प्रतिबंधात्मक एकच उपाय असल्यामुळे महाराष्ट्र शासनातर्फे राज्यभरात 'ट्रान्सफार्मिंग महाराष्ट्र' प्रकल्पांतर्गत जनजागृती केली जात आहे. मंगळवारी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसाठी या प्रकल्पांतर्गत पोलीस आयुक्तालायत 'सायबर जाणीव जागृती कार्यक्रम' घेण्यात आला असून त्यामध्ये सायबर गुन्ह्यांविषयक माहिती देऊन त्यावरील उपाययोजनेसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.सायबर जाणीव जागृती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी सायबर गुन्ह्याविषयक माहिती देऊन जनजागृतीवर भर देण्याचे आवाहन प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना केले. यावेळी पोलीस उपायुक्त प्रदीप पवार, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, सायबर सेलचे सहायक पोलीस निरीक्षक कांचन पांडे, पीएसआय कान्होपात्रा बन्सा, पोलीस कर्मचारी संग्राम भोजने उपस्थित होते. पोलीस आयुक्त मंडलीक यांनी ट्रान्सफार्मिंग महाराष्ट्र प्रकल्पाच्या उद्देशावर प्रकाश टाकला, ते म्हणाले, आजच्या युगात इंटरनेट मानवाचा अविभाज्य घटकच बनला आहे.इंटरनेटचा वापर करताना सावधगिरी बाळगली, तर सायबर गुन्हे टाळण्यास मोठी मदत मिळू शकते. सायबर गुन्हेगार नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हे करतात. त्यात सामान्य नागरिक बळी पडून आर्थिक व सामाजिक नुकसान होते. सायबर गुन्हे रोखण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक झाली असून त्या अनुषंगाने शासनातर्फे राज्यभरात ट्रान्सफॉर्मींग महाराष्ट्र प्रकल्पांतर्गंत कार्यक्रम राबविले जात आहे. एपीआय कांचन पांडे यांनी सायबर गुन्ह्याविषयक माहिती देत त्यावरील उपाययोजना सुचवित प्रतिबंधात्मक उपाय सायबर गुन्हे रोखू शकते, असे मत व्यक्त केले. सायबर गुन्ह्यातील फिशींग, हॅकिंग, नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणे, विवाहविषयक फसवणूक, वैयक्तिक ओळख चोरी, बँकविषयक फसवणूक, एटीएमविषयक फसवणूक, विमा विषयक फसवणूक, समाजमाध्यमांद्वारे होणारे गुन्हे, आॅनलाईन खरेदीतील फसवणूक अशा आदी गुन्ह्यांवर पांडे यांनी प्रकाश टाकत त्यावर उपाय सुचविले. या गुन्ह्यांविषयक थोडीसी माहिती इंटरनेटचा वापर करणाºयास असल्यास हे गुन्हे टाळले जाऊ शकतात, असे मत कांचन पांडे यांनी प्रसार माध्यमांसमोर व्यक्त केले. तसेच सायबर गुन्हेगार कशाप्रकारे गुन्हे करतात. त्यानुसार इंटरनेट हाताळताना नागरिकांनी कशी काळजी घ्यावी, यावर उपाय त्यांनी सांगत प्रसार माध्यमांना जनजागृती करण्याचे आवाहन केले.