शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

इच्छुक उमेदवारांच्या उपस्थितीतच झाला त्यांच्या उमेदवारीला विरोध

By admin | Updated: July 14, 2014 00:50 IST

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अचलपूर

बाहेरचा लादलेला उमेदवार नकोच : भाजपच्या बैठकीत कार्यकर्त्यांचा सूरसुरेश सवळे चांदूरबाजारविधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अचलपूर मतदारसंघातील भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. बाहेरचा व लादलेला उमेदवार विधानसभा निवडणुकीत नको, असा सूर या बैठकीचा होता. या बैठकीत अचलपूर मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी इच्छुक उमेदवारांचे नाव न घेता काही वर्षांपूर्वी भाजपात पदार्पण केलेल्या व बाहेरचा लादलेला उमेदवार मतदारसंघात सहन केला जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका मांडून तसा ठरावच प्रदेशाध्यक्षांकडे पाठविल्यामुळे ही बैठक अख्या मतदारसंघात चांगलीच चर्चिली जात आहे.शुक्रवारी अचलपूर मतदारसंघातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची एक बैठक स्थानिक आनंद सभागृहात पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भारसाकळे हे होते. मनोहर सुने, प्रमोद कोरडे, अशोक बनसोड, रूपेश ढेपे, गजानन कोल्हे, चक्रधर घुलक्षे, रवी पवार यांच्यासह अनुसूचित जाती-जमाती, अल्पसंख्याक आघाडी व तालुक्यातील सर्व बुथ प्रमुख उपस्थित होते.सुरुवातीला या बैठकीत गुणवंत विद्यार्थ्यांचा व डॉ. आंबेडकर पुरस्कार प्राप्त बापूसाहेब देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर झालेल्या चर्चेत मतदारसंघातील उमेदवारीचा मुद्दा चांगलाच गाजला. या बैठकीत वेगळे विदर्भ राज्य निर्माण करण्याचा ठराव संमत करण्यात आला. तसेच अचलपूर मतदारसंघ हा भाजपचा परंपरागत मतदारसंघ असताना मागील विधानसभा निवडणुकीत हा शिवसेनेला देण्यात आला. मात्र त्यावेळी सेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपला देण्यात यावा, असा ठराव संमत करण्यात आला.यानंतर झालेल्या चर्चेत गजानन कोल्हे यांनी उमेदवारीचा प्रश्न उचलून धरला. पक्षाला ‘अच्छे दिन’ आल्याचा उल्लेख करून पक्षात इतर पक्षातून आलेल्यांची रांग लागली आहे. त्यामुळे जुन्या व पक्षात एकनिष्ठ कार्यकर्त्यांची गोची होणार आहे. या आधीही काही नेते पक्षात आले आणि ते आता उमेदवारीची मागणी करीत आहेत. आताही अनेक जण पक्षाच्या दारात उभे आहेत. अशीच अवस्था राहिली व त्यांना उमेदवारी मिळाली तर सुसंस्कृत पक्षाला काँग्रेसचे स्वरूप येईल, अशी भूमिका स्पष्ट करून मतदारसंघाच्या बाहेरचा व लादलेला उमेदवार मतदारसंघातील कार्यकर्ते कदापिही सहन करणार नाही, असा इशाराच दिला. सदर ठराव संमत करून प्रदेशाध्यक्षांना पाठविण्यात आला आहे. सभाध्यक्ष भारसाकळे यांनी लोकसभेतील यशाचे श्रेय मोदींना देऊन मतदारांनी स्वयंस्फूर्तीने मतदान केल्याचे सांगितले. यावेळी कार्यकर्त्यांनी किती प्रमाणात काम केले हे तपासून पाहण्याची आवश्यकता व्यक्त करून अप्रत्यक्षपणे कार्यकर्त्यांच्या प्रामाणिकतेवरच प्रश्नचिन्ह उभे केले. याबाबत कार्यकर्त्यांनी मात्र नाराजी व्यक्त केल्याने ही बैठक वादळी ठरली.