शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याचा एकात्मिक व्हिजन आराखडा तयार

By admin | Updated: April 2, 2015 00:33 IST

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा प्रशासनाने अमरावती व्हिजन-२०२० आराखडा तयार करण्याचा संकल्प डिसेंबर, २०१४ मध्ये केला होता.

मिशन २०२० : जिल्हाधिकाऱ्यांची माहितीअमरावती : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा प्रशासनाने अमरावती व्हिजन-२०२० आराखडा तयार करण्याचा संकल्प डिसेंबर, २०१४ मध्ये केला होता. त्यानुसार सर्व विभागाकडून क्षेत्रनिहाय माहिती घेण्यात आली व प्रत्येक क्षेत्रामध्ये सध्या असलेल्या परिस्थितीवरुन पुढील ५ वर्षांचा लक्षांक, केंद्र व राज्य शासनाच्या धोरणानुसार योजनांची माहिती संकलीत करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी बुधवारी आयोजीत पत्रपरीषद दिली.ते जिल्हा प्रशासनाने आयोजीत केलेल्या पत्रपरीषदेत मार्गदर्शन करतांना बोलत होते. पुढे बोलतांना गित्ते म्हणाले जिल्ह्याच्या भौतिक, आर्थिक व सामाजिक आव्हाने समोर ठेवून प्रत्येक विभागासाठी ५ वर्षांचा कालबध्द, लक्ष निर्धारीत कृती आराखडा आखण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने कृषी, जलसंपदा, पेयजल व स्वच्छता, शिक्षण, क्रीडा, आरोग्य, आदिवासी विकास, गृहनिर्माण, विद्युत, रस्ते, वाहतूक, रेल्वे, विमानसेवा, उद्योग, रेशीम उद्योग, पर्यटन व कला-सांस्कृती इत्यादी सर्व विभागाचे मुख्य उद्दिष्टे निर्धारित करुन संपूर्ण जिल्ह्याचा एकात्मिक आराखडा तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगीतले. यासाठी जिल्हयाचे तत्कालीन पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली २ डिसेंबर २०१४ रोजी बैठक घेण्यात आली तसेच त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली मागील ३ महिन्यांमध्ये विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत १० बैठका घेण्यात आल्या. जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या गाव मुक्काम कार्यक्रमातून देखील आवश्यक माहिती घेण्यात आली. या आराखड्याचे प्रारुप सर्व नागरिकांकरिता अवलोकनार्थ जिल्हा प्रशासनाच्या संकेत स्थळावर १ एप्रिल ते ७ एप्रिल २०१५ या कालावधीत उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या अमरावती व्हिजन २०२० चा मुळ उद्देश जिल्ह्यातील २८ लक्ष नागरिकांना उच्च दर्जाच्या मुलभूत नागरी सुविधा पुरविणे, कृषी क्षेत्राच्या विकासासाठी सिंचना सुविधा उपलब्ध करण्यासोबतच आरोग्य, शिक्षण, शहरी व ग्रामीण भागातील लोकांसाठी रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे इत्यादी आहेत. या अमरावती व्हिजन-२०२० मधील योजनांची अंमलबजावणी गतीमान, पारदर्शी व प्रभावी पध्दतीने करुन जिल्ह्याच्या सध्याच्या मानव विकास निर्देशांकात ०.७१ वरुन ०.८१ पर्यंत वाढ होणे अपेक्षीत आहे. तसेच राज्यातील पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये अमरावती जिल्ह्याचे स्थान निश्चित होण्याचे ध्येय आहे. या व्हिजनमध्ये ठेवण्यात आले आहे. यासाठी सर्वाच्या सहकार्याची अपेक्षाही जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केली आहे.