शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

लग्न ठरलेल्या गर्भवती तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 23:31 IST

प्रेमप्रकरणातून गर्भवती झाली आणि त्यातच कुटुंबीयांनी लग्न ठरविले. गुपित उघड झाल्यास बदनामी होईल, या भीतीने एप्रिल महिन्याच्या शेवटी ठरलेल्या लग्नापूर्वीच तरुणीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. रविवारी रात्री ही घटना कुºहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. गंभीर स्थितीत सदर तरुणीला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोमवारी कुºहा पोलिसांनी तरुणीचे बयाण नोंदविले.

ठळक मुद्देमानसिक तणावातून उचलले पाऊल : कुºहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : प्रेमप्रकरणातून गर्भवती झाली आणि त्यातच कुटुंबीयांनी लग्न ठरविले. गुपित उघड झाल्यास बदनामी होईल, या भीतीने एप्रिल महिन्याच्या शेवटी ठरलेल्या लग्नापूर्वीच तरुणीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. रविवारी रात्री ही घटना कुºहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. गंभीर स्थितीत सदर तरुणीला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोमवारी कुºहा पोलिसांनी तरुणीचे बयाण नोंदविले.कुºहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी एक २४ वर्षीय तरुणीचे गावातील एका तरुणासोबत प्रेमसुत जुळले होते. प्रेमसंबधातून दोघांनी शारीरिक संबध प्रस्थापित केले. त्यातून ती तरुणी गर्भवती झाली. ही माहिती तिने कुटुंबीयांपासून लपविली होती.दरम्यान, कुटुंबीयांनी लग्नासाठी मुलगा पाहण्यास सुरुवात केली. परिसरातीलच एका मुलाशी लग्न ठरले. एप्रिल महिन्याच्या शेवटी मुहूर्त निघाला. इकडे मात्र तरुणीची घालमेल वाढली होती. काय करावे अन काय नाही, अशा मनस्थितीत त्या तरुणीने अखेर टोकाचा निर्णय घेतला. रविवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास तिने विष प्राशन केले. हे लक्षात येताच कुटुंबीयांना तिला तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. तिची प्रकृती गंभीर होती. या घटनेची माहिती इर्विन पोलीस चौकीतून कुºहा पोलिसांना देण्यात आली.कुºहा पोलिसांचे पथक रात्री १० वाजता इर्विनला पोहोचले. त्यांनी तरुणीचे बयाण घेण्याचे प्रयत्न केले. मात्र, ती बयाण देण्यास असमर्थ होती. त्यामुळे सोमवारी कुºहा पोलीस पुन्हा बयाण घेण्यासाठी पोहोचले. त्या तरुणीने पोलिसांना बयाण दिल्यावर हा सर्व प्रकार उघड आला. ती मुलगी गर्भवती असल्याचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला आहे. सद्यस्थितीत पीडित मुलीने कोणाविरुद्ध तक्रार दिलेली नाही.प्रेमप्रकरणातून गर्भवती झालेल्या मुलीचे लग्न ठरले आहे. तिने मानसिक तणावात येऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. नातेवाइकांची चौकशी व मुलीने तक्रार दिल्यास कारवाईची पुढील दिशा ठरेल.- सचिन जाधव, पोलीस निरीक्षक, कुºहा ठाणे