शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटातील गर्भवती, स्तनदा मातांसह कुपोषित बालकांचा आहार बंद; अडीच हजार अंगणवाडी केंद्रांना टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 18:34 IST

विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी सोमवारपासून संप पुकारला आहे. परिणामी जिल्ह्यातील २५०० अंगणवाडी केंद्रातील ८० हजारांपेक्षा अधिक बालकांसह सहा हजारांवर गर्भवती आणि स्तनदा मातांना दिला जाणारा पोषणआहार पुरवठा बंद आहे.

परतवाडा, दि. 12 - विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी सोमवारपासून संप पुकारला आहे. परिणामी जिल्ह्यातील २५०० अंगणवाडी केंद्रातील ८० हजारांपेक्षा अधिक बालकांसह सहा हजारांवर गर्भवती आणि स्तनदा मातांना दिला जाणारा पोषणआहार पुरवठा बंद आहे. त्याचा फटका अतीसंवेदनशील मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्याला बसणार आहे. सोमवारपासून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस संपावर गेल्याने जिल्ह्यातील १४ प्रकल्पांतर्गत येणाºया अडीच हजार अंगणवाडी केंद्रांना टाळे लागले आहेत. जिल्ह्यात ३ ते ६ वयोगटातील ८० हजारांवर लाभार्थी बालके आहेत. 

मेळघाटातील सर्व आहार बंद मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यात ४८२ अंगणवाडी केंद्र असून ३५ हजार बालक आहेत. पैकी २ हजारावर बालके ३ ते ६ वयोगटातील  आहेत. त्यांना दररोज अंगणवाडी केंद्रातून मुगाची उसळ, तूर डाळ, तांदळाची खिचडी, अंडी दिली जाते. मेळघाटात कुपोषणाचे प्रमाण सर्वाधिक असल्याने शासनातर्फे आदिवासी बालकांची विशेष काळजी घेण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात येतो. मात्र सोमवारपासून अंगणवाडी केंद्रांनाच टाळे असल्याने सर्व बालकांना देण्यात येणारा पूरक पोषण आहार बंद आहे. 

सहा हजार स्तनदा मातांचा आहार बंद गर्भवती आदिवासी महिलांना सुदृढ बालक जन्माला यावे, यासाठी तर जन्मणारे बालक कुपोषित होऊ नये, याकरिता स्तनदा मातांसाठी मेळघाटात ‘अमृत आहार योजना’ चालविण्यात येत आहे. मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यांत सहा हजारांवर गर्भवती आणि स्तनदा माता आहेत. त्यांना या योजनेंतर्गत वरण, भात, भाजी, पोळी, अंडी, शेंगदाणा लाडू आदी आहार दिला जातो. मात्र, सोमवारपासून हा आहारही  बंद पडला आहे. 

मुले आली अन् परत गेली मेळघाटातील अंगणवाडी केंद्रात आदिवासी मुले नेहमीप्रमाणे हातात ताट घेऊन आले. मात्र, अंगणवाडी केंद्राला कुलूप पाहून आल्या पावली परत गेली. अंगणवाडी सेविका व मदतनिसांचा संप लवकर न मिटल्यास मेळघाटातील कुपोषित बालकांच्या संख्येत झपाट्याने वाढ होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. 

शाळेतून दिली खिचडीदररोज पोषण आहाराच्या आशेने अंगणवाडीत येण्याची सवय असल्याने नेहमीप्रमाणे चकरा मारणा-या चिखलदरा तालुक्यातील सोमवारखेडा यागावांतील दोन चिमुकल्यांना अखेर जिल्हा परिषदेच्या शाळेतून खिचडी देऊन त्यांचे समाधान करण्यात आले. 

अंगणवाडी सेविका व मदतनीस सोमवारपासून संपावर गेल्याने जिल्हाभरातील अंगणवाडी केंद्र बंद आहेत. संप लवकर मिटेल, अशी आशा आहे. - कैलास घोडके, उपमुख्यकार्यपालन अधिकारी म.बा.क. अमरावती