शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
4
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
5
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
6
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
7
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
8
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
9
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
10
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
11
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
12
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
13
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
14
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
15
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
16
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
17
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
18
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
19
Tejasvee Ghosalkar: तेजस्वी घोसाळकर मुंबै बँकेच्या संचालकपदी
20
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना

सामान्यांच्या कामांना प्राधान्य द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2016 00:27 IST

दिवसेंदिवस प्रशासकीय कामे वेगाने होणे गरजेचे असताना प्रशासनाची कासवगती कायम आहे़...

वीरेंद्र जगताप : आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना निर्देशधामणगाव रेल्वे : दिवसेंदिवस प्रशासकीय कामे वेगाने होणे गरजेचे असताना प्रशासनाची कासवगती कायम आहे़ त्यामुळे सर्वसामान्यांना न्याय मिळत नाही़ सामान्यांच्या कामांना प्रशासकीय यंत्रणेने प्राधान्य देण्याचे निर्देश आढावा बैठकीत आ़ वीरेंद्र जगताप यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत़स्थानिक पंचायत समितीच्या भवनात तालुकास्तरीय समित्यांची बैठक आ़वीरेंद्र जगताप यांनी घेतली़ प्रशासनाच्या कामाकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने अनेक प्रकरणे एकाच ठिकाणी प्रलंबित पडून असल्याचे निदर्शनास येत आहे़ कर्मचाऱ्यांनी आपली सेवा योग्य रीतीने बजावली तर सर्व सामान्यांना आपोआप न्याय मिळते़ आपले कर्तव्य कर्मचारी व अधिकाऱ्यांनी न विसरता दररोज किमान आपल्या टेबलवरील चार फाईल पुढे पाठविल्या तरच गतिमान प्रशासन दिसेल. मात्र शासनाचे या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष होत आहे़ आपल्या मतदारसंघातील प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सामान्यांचे प्रकरणे त्वरित निकाली काढावीत, असे निर्देश दिले़या बैठकीत जलयुक्त शिवार अंतर्गत सुरू असलेली कामे, स्वस्त धान्य दुकानासंदर्भातील तक्रारी शेतात वीजपुरवठा किती काळात दिला जातो़ भारनियमन यासंदर्भातील आढावा घेण्यात आला़ आढावा बैठकीला जि़प़अध्यक्ष सतीश उईके, जि़प़ सदस्य मोहन सिंघवी, रंजना उईके, मोहन घुसळीकर, समन्वय समितीचे सुनील थूल, संजय तायडे, शिवा शिंदे, विजया इंगोले, भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या साधना ढाणके, भानुदास ढगे, रमेश पुनसे, नरेंद्र पाचबुद्धे संजय सावंत, संजय गोठाणे, अब्दुल सलिम, अब्दुल हमीद, प़ंस़ सभापती गणेश राजनकर, गटविकास अधिकारी पंकज भोयर,पं़स़सदस्य सचिन पाटील, पं़स़ सदस्या संगीता निमकर, सविता इंगळे, प्रिती ढोबळे, तर जि़ल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता किशोर साकुरे, धाबर्डे, वीज मंडळाचे फडवणीस, वन विभागाचे एऩआऱ गावंडे, तालुका आरोग्य अधिकारी शेंडे, ऩप़ चे मुख्याधिकारी सुरेश टाकरखेडे, भूमिअभिलेख उपअधीक्षक वळवी, यांच्यासह सर्वच विभागाचे अधिकारी विविध समित्यांचे पदाधिकारी उपस्थित होते़ (तालुका प्रतिनिधी)