शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

वलगावात सापडले अकोला येथील महिलेचे प्रेत

By admin | Updated: July 25, 2015 00:10 IST

चांदूरबाजार मार्गावरील सतीनगरसमोरील शेतात एका ४० वर्षीय महिलेचे भाजलेल्या अवस्थेत प्रेत आढळून आले.

दुसरी गंभीर, तिसरी पळाली : विजेची तार चोरताना घटना घडल्याचा अंदाजअमरावती : चांदूरबाजार मार्गावरील सतीनगरसमोरील शेतात एका ४० वर्षीय महिलेचे भाजलेल्या अवस्थेत प्रेत आढळून आले. दुसऱ्या गंभीर भाजलेल्या महिलेला जखमी अवस्थेत जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर अन्य एक महिला जखमी अवस्थेत घटनास्थळावरून पसार झाली. या घटनेमुळे पोलीस यंत्रणेत खळबळ उडाली आहे. घटनास्थळाहून पोलिसांनी दोर, पिंचीस, पोते आणि तार कापण्याचे अन्य साहित्य जप्त केले असून या महिलांचे विद्युत तार चोेरणाऱ्या टोळीशी ‘कनेक्शन’ असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ही घटना गुरूवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपासून सतत विद्युत तार चोरीच्या घटना घडत आहेत. पोलिसांनी याप्रकरणी अकोला जिल्ह्यातील चोरट्यांच्या टोळीला अटकही केली होती. परंतु त्यानंतरही हा प्रकार थांबलेला नाही. या घटनेतील मृत आणि गंभीर जखमी महिला अकोला जिल्ह्यातील रहिवासी आहेत. गुरूवारी पहाटे वलगावनजीक चांदूरबाजार मार्गावर सतीनगर समोरील शेतात एका महिलेचे प्रेत आढळून आले. अन्य महिला घटनास्थळीच गंभीर जखमी अवस्थेत आढळून आली. त्या महिलेला तत्काळ जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चौकशीअंती या घटनेनंतर आणखी एक महिला घटनास्थळावरून गंभीर जखमी अवस्थेत पळाल्याचे उघडकीस आलरे. पोलिसांनी शेतात सापडलेल्या साहित्याच्या आधारे तीनही महिला विजेच्या तारा चोरण्याकरिता आल्या व तार तोडताना विजेच्या प्रवाहाने जखमी झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे. जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल महिलेची चौकशी केली असता तिने तिचे नाव गीता घोडे असे सांगितले. ती ७७ टक्के भाजली असून मृत महिलेचे नाव गुंफा जाधव (रा.हरिहरपेठ, अकोला) असे आहे. या घटनेची माहिती वलगाव पोलिसांनी अकोला पोलिसांना दिली असता अकोला पोलिसांनी पळालेल्या पिंकी नामक महिलेला ताब्यात घेतले आहे. पिंकीदेखील गंभीररीत्या भाजल्यामुळे तिला अकोला येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपनिरीक्षक राजू लेवटकर यांच्या मते अमरावती शहरातील नवसारी ते आसेगाव पूर्णापर्यंत ब्रिटिशकालीन विद्युत लाईन टाकण्यात आली आहे. त्यावर तांब्याची तार लागलेली आहे. या तारेची चोरी करण्याकरिता विद्युत तार चोरटे लागोपाठ चोऱ्या करीत आहेत.या महिला विद्युत तार चोरट्यांच्या गिरोहाशी जुळलेल्या असल्याचा पोलिसांना दाट संशय आहे. भाजलेली जी महिला घटनास्थळाहून पसार झाली तिला अकोला येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिचे बयाण नोंदविण्याकरिता वलगाव पोलीस रवाना झाले आहेत. बयाण नोंदविल्यानंतर वास्तव समोर येईल. या महिलांच्या मागे पुरूष सूत्रधार असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. - राजू लेवटकर, उपनिरीक्षक, वलगाव.