शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

प्रचारतोफा शांत, सोमवार ठरला महापदयात्रांचा वार

By admin | Updated: October 13, 2014 23:14 IST

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बुधवारी मतदान होईल. नियमानुसार सोमवारी सायंकाळी प्रचारतोफा थंडावल्या. मात्र, जिल्ह्यातील सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी शेवटच्या दिवशी महापदयात्रा काढून

अमरावती : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बुधवारी मतदान होईल. नियमानुसार सोमवारी सायंकाळी प्रचारतोफा थंडावल्या. मात्र, जिल्ह्यातील सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी शेवटच्या दिवशी महापदयात्रा काढून शक्तिप्रदर्शन केले. काही उमेदवारांच्या महापदयात्रांनी वातावरणनिर्मिती केली. मात्र, मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात, हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल. यंदा विधानसभा निवडणुकीत आघाडी, युती संपुष्टात आल्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना, भाजप या पक्षांचे उमेदवार निश्चित करताना दाणादाण उडाली. त्यामुळे वेळेवर कोणाला उमेदवारी द्यावी, हा प्रश्नदेखील पक्षश्रेष्ठींसमोर उपस्थित झाला. आघाडी, युतीतील घरोबा संपुष्टात आल्यामुळे अनेकांना उमेदवारीची लॉटरी लागली. ज्यांनी कधी जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिकेची निवडणूक लढविली नाही, असे काही उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या मैदानात आहेत. पक्षाने उमेदवारी बहाल केल्यामुळे काहींनी सोमवारी महापदयात्रा काढून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. या महापदयात्रांचा काही अंशी परिणाम होईल, असे बोलले जात आहे. मात्र, कोणाला मतदान करावे, हे सर्वस्वी मतदारांवरच निर्भर आहे. शिवाय बहुतांश मतदार पक्ष आणि विचारसरणीवरच मतदान करणारा असल्यामुळे १५ आॅक्टोबर रोजी कोणाच्या बाजूूने मतदार उभे राहतात, हे १९ आॅक्टोबर रोजी स्पष्ट होईल. ग्रामीण भागात उमेदवारांनी महापदयात्रा काढून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. महापदयात्रेत सहभागी होण्यासाठी काहींनी बाहेरून कार्यकर्ते आयात केले होते. महापदयात्रेनंतर कार्यकर्त्यांची गर्दी हॉटेल, बीअरबार, ढाब्यांवर दिसून आली. १३ दिवसानंतर सोमवारी उमेदवारांना दिलासा मिळाला. मात्र संपूर्ण मंगळवार ‘सेटिंग’मध्येच जाणार आहे. आठही मतदार संघातील चित्र १९ आॅक्टोबरनंतरच स्पष्ट होईल.