जल्लोष : उपाध्यक्षपदी अशोक चौधरी यांची वर्णीप्रभाकर भगोले चांदूररेल्वेयेथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापतीपदासाठी शुक्रवारी निवडणूक घेण्यात आली. यात सभापतीपदी प्रभाकर वाघ व उपसभापतीपदी अशोक चौधरी यांची निवड झाली.सभापती, उपसभापती निवडीसाठी १८ सप्टेंबर रोजी बाजार समितीत विशेष सभा सहाय्यक निबंधक के.पी. धोपे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सभापतीपदासाठी प्रभाकर वाघ यांचा एक अर्ज प्रदीप वाघ व अतुल चांडक यांच्या सह्यानिशी सादर केला.उपसभापती पदासाठी अशोक वामनराव चौधरी यांचा अर्ज प्रदीप वाघ, प्रदीप जगताप यांच्या सह्यानिशी सादर केला. सभापती-उपसभापतीपदासाठी एक-एक अर्ज आल्याने निवडणूक अधिकारी के.पी. धोपे यांनी सभापतीपदासाठी वाघ व उपसभापतीपदी अशोक चौधरी यांची अविरोध निवड केली. बाजार समितीत आ. वीरेंद्र जगताप यांचे १८ संचालक निवडून आल्याने निवडणूक अविरोध होईल अशी चर्चा होती.
चांदूररेल्वे बाजार समिती सभापतिपदी प्रभाकर वाघ अविरोध
By admin | Updated: September 19, 2015 00:10 IST