पुसला : शेतातील डीबीवरील उच्चदाबामुळे वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतातील ओलीत करणे कठीण होत आहे. त्यामुळे नवीन डीबी बसविण्याची मागणी युवा मित्र मंडळ व शेतकऱ्यांनी महावितरणकडे केली आहे.
काही दिवसांपासून तरोळी शिवारातील शेतात वीजपुरवठा करणाऱ्या डीबीवर उच्च दाबामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. ओलिताला मर्यादा आल्याने बागायती पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे नवीन डीबी बसविण्याची मागणी सूरज धर्मे, संदीप बागडे, योगेश विंचूरकर, राजेश गजभिये, अतुल पाटील, योगेश ढोरे, हर्षल ढोरे, दत्तू अळसपुरे, होमचंद जिचकार, दयाराम गोंडाणे यांनी केली आहे.
---