शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावरील खड्डे अजूनही कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 22:15 IST

अमरावती जिल्ह्यातील व विभागातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते खड्डेमुक्त झाल्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

ठळक मुद्देचांदूरबाजार-खरवाडी रस्ता : सा.बां. विभागाचे दुर्लक्ष

आॅनलाईन लोकमतचांदूरबाजार : अमरावती जिल्ह्यातील व विभागातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते खड्डेमुक्त झाल्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. चांदूरबाजार-वलगाव-अमरावती मार्गातील खड्डे मात्र आजही अपघाताला आमंत्रण देत आहेत.चांदूरबाजार-अमरावती वलगाव मार्गे हा जिल्ह्यातील सर्वांत जुना सार्वजनिक बांधकाम विभागाचा मार्ग आहे. याच मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालयसुद्धा आहे. त्यांच्या कार्यालयापासून दोन-तीन किलोमीटरवरच मोठमोठे खड्डे पडलेले आहे. तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येत नसल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच या रस्त्यावर मुक्ताई लॉनजवळ टाटा समूह व काळी-पिवळई एकमेकांवर धडकून अपघात झालेला आहे. त्याच ठिकाणी हे खड्डे पडलेले आहे. हा अपघात या खड्ड्यामुळे तर घडला नाही ना, असेही वाहनचालकांमध्ये चर्चा होत आहे. कारण या रस्त्यावरील खड्डे हे मोठमोठे आहे आणि खड्डे वाचविण्याचा प्रयत्न प्रत्येक वाहन चालक करीत असतो व रात्रीच्या वेळी पुढील वाहन हे किती दूर आहे, याचा अंदाज व्यक्त होत नसल्याने रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात बरेच अपघात होतात.चांदूरबाजार ते खरवाडीपर्यंतच्या रस्त्यावर अनेक मोठमोठे खड्डे आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात रात्रंदिवस वाहतूक सुरू राहते. मोठ्या वाहनाबरोबर मोटारसायकल चालकांनादेखील खड्डे चकुविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते.खड्ड्यांमुळे लहान-मोठे अपघात कित्येकदा होतात. हा मार्ग चांदूरबाजार सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येतो.थातूरमातूर बुजविले खड्डेराज्याच्या बांधकाममंत्र्यांनी विभागातील रस्ते खड्डेमुक्त झाल्याची घोषणा केली असतानाही चांदूरबाजार सार्वजनिक बांधकाम उपविभाग झोपेत आहे. तालुक्यातील काही रस्त्यांवरील खड्डे कायमच आहेत, तर काही रस्त्यावरील खड्डे हे थातूरमातूर बुजविल्याने ते पुन्हा उखडण्यास सुरुवात झाली असल्याचे प्रवासी व वाहनचालकांमध्ये चर्चा रंगू लागली आहे.ब्रिटिशकालीन रस्तागॅजेटमध्ये ब्रिटिशांच्या राजवटीत हा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाचाच होता, असा उल्लेख आहे. या मार्गावर दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात निंबाची झाडे लावल्याचा उल्लेख त्यात केलेला आहे. आघाडी शासन असताना तत्कालीन पालकमंत्री वसुधा देशमुख यांच्या कार्यकाळात या मार्गाचे रुंदीकरण व डांबरीकरण करण्यात आले होते.