शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पोटेंची निवडणूक अन् गडकरीपुत्राचा खुलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 23:05 IST

नितीन गडकरी यांचे पुत्र निखिल हे अमरावती स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढतील आणि त्या मतदारसंघातून निवडून आलेले अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे हे विधानसभा निवडणूक लढतील, अशा ज्या ज्वाला अंबानगरीतून उठविण्यात आल्यात,....

ठळक मुद्देराजकारण : कुणी टाकली ठिणगी ? नितीन गडकरींच्या मनात काय?

आॅनलाईन लोकमतअमरावती : नितीन गडकरी यांचे पुत्र निखिल हे अमरावती स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढतील आणि त्या मतदारसंघातून निवडून आलेले अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे हे विधानसभा निवडणूक लढतील, अशा ज्या ज्वाला अंबानगरीतून उठविण्यात आल्यात, त्याचा दाह खुद्द गडकरी कुटुंबीयांनाही जाणवला. अखेर गडकरीपुत्र निखिल यांनी प्रसिद्धीपत्रक काढून ''मी निवडणूक लढणार नाही. तसा विषयही माझ्या डोक्यात नाही. माझे तीर्थरूप व भारत सरकारातील केंद्रीय मंत्री मा.नितीन गडकरी यांनी कुटुंबीयांपैकी कुणीच राजकारणात नसल्याचे स्पष्ट केले आहे. यावरून आमच्या गडकरी कुटुंबीयांची याविषयीची भावना स्पष्ट होते.'' असा सुस्पष्ट खुलासा स्वत:हून केला. आता मुद्दा असा उपस्थित होतो की, निखिल हे निवडणूक लढविणार नसताना आणि नितीन गडकरी यांची तशी तिळमात्रही इच्छा नसताना ही ठिणगी टाकली कुणी?राजकारणातील जाणकारांमध्ये, विशेषत: भाजपजणांमध्ये यासंबंधाने वेगवेगळे मतप्रवाह आहेत. एक मतप्रवाह असा- अनिल बोंडे हे वरिष्ठ आणि अनुभवी नेता आहेत. थेट लोकांमधून ते निवडून आले आहेत. या विस्तारात त्यांना मंत्रिपद मिळेल, अशी जी व्यापक चर्चा झडत राहिली, त्यातून बोंडे यांची इच्छा अधोरेखित होते. किती वर्षे आमदारच रहायचे? अनुभव जास्त, शिक्षण जास्त, निवडून येण्याची कुवत तरीही तुलनेने सर्वच बाबतीत कमी असलेल्या व्यक्तिला मंत्रिपद मिळावे आणि आपण त्यांच्या नेतृत्त्वात काम करावे, या शल्यातून हा आगडोंब उसळला असावा.दुसरा मतप्रवाह असा- प्रवीण पोटे हे चाणाक्ष राजकारणी. बांधकाम व्यवसायातून ते अनेक्षितपणे आमदार झाले. लगेच डोक्यावर राजमुकुटही मिळविला. अनेक वर्षे राजकारणात राहूनही मंत्रिपद मिळवितात कसे, याचा भल्याभल्यांना तळ लागला नाही अन् पोटे पाटलांनी चक्क पालकमंत्रिपद आणले. थेट जनतेतून निवडून येणाऱ्यांना जणू दाखविलेल्या त्या वाकुल्याच होत्या. भाजपक्षातही अस्वस्थता वाढली. सार काय तर पोटे पाटलांना विरोध वाढला. कधीही काढला जाईल, अशी स्थिती असतानाही मुकुट त्यांनी लिलया सांभाळला. तथापि त्यांच्या मंत्रिपदामुळे एक घडले. फारसा आकर्षणमूल्य नसलेला अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ चमकला. चर्चेत आला. 'गणिते जुळविल्या'स या मतदारसंघातून विजय हमखास मिळतोच, या राजकीय विचाराचे फुल उमलले. सुगंध चहुदिशेने दरवळला. अनेक इच्छुक भावी आमदार-मंत्री फुलपाखराप्रमाणे या सुगंधाकडे ओढले गेले. स्पर्धा वाढू लागली. ऐनवेळी पत्ता कापला जाऊ नये म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याआधीच स्पर्धकांना बाद करण्याची बुद्धीवान खेळी पोटे पाटलांनी खेळली. नितीन गडकरी यांचे पुत्र या मतदारसंघातून लढणार आहेत. त्यांच्यासाठी पोटे पाटील जागा रिकामी करून देणार आहेत, हा विचार पेरला गेला. खुद्द गडकरीपुत्रच येणार म्हटल्यावर मतदारसंघावर डोळा ठेवून असलेल्या बहुतांश नवख्या इच्छुकांची दांडी उडाली. ज्या स्पर्धेत टिकूच शकणार नाही, त्या स्पर्धेत उतरायचेच कशाला, या विचाराने त्यांनी लढण्यापूर्वीच सपशेल माघार घेतली. पोटे पाटलांचे इप्सित साधले गेले.तिसरा मतप्रवाह सांगतो की, भाजपच्या जुन्या जाणत्या मंडळींना पोटे पाटील नको आहेत. अमरावतीच्या पोटे पाटलांना डावलून अकोल्याच्या रणजित पाटलांना मुद्दामच जवळ करणारे भाजपजन अमरावतीत बघता येतात, ते त्याचमुळे. सुजाण रणजित पाटील अजाण बनून या खेळीत सहभागी होतात नि आनंदही लुटतात. अमरावतीच्या राजकारणात त्यांचा 'तसा इंटरेस्ट' नसला तरीही मुख्यमंत्र्यांच्या खासे जवळचे म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा उपयोग पोटे पाटलांच्या मार्गात गतिरोधक उभारण्यासाठी खुबीने कसा करवून घ्यायचा, याची जाण येथे अनेकांना आहेच.निखिल यांनी दिलेला खुलासा या प्रकरणाचे गांभीर्य कथन करणारा आहे. नितीन गडकरी या प्रकरणाकडे कसे बघतात, यावर भविष्यातील अनेक घडामोडी अवलंबून असतील.