तुमसर : नगरपरिषद तुमसर विरुद्ध नागपूर उच्च न्यायालयाकडून कृषी उत्पन्न बाजार समिती तुमसरला बांधकाम तोडफोडीच्या विरोधात स्थगनादेश दिला आहे.तुमसर नगरपरिषदच्या वतीने जुन्या गंज बाजारातील बाराकारी बांधकाम पाडायला सुरुवात केली होती. नगरपरिषद तुमसर ही मालमत्तेची मालक नसल्यामुळे संबंधित जागेवर नगरपरिषदला काही बांधकाम करावयाचे असल्यास कृषी उत्पन्न बाजार समितीची लिखीत मंजूरी द्यावी. तसेच आतापर्यंत किरायाने दिलेल्या दुकानात, गाळे यांच्याकडून प्राप्त झालेला किराया वेगळे खाते करून ठेवण्यात यावे. असे आदेश मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने नगरपरिषदला दिले. कृषी उत्पन्न बाजार समितीला शासकीय परिपत्रकानुसार जुना गंज बाजार मधील जागा देण्यात आली होती. त्यामुळे या जागेसाठी तुमसर नगरपरिषदेने कृषी उत्पन्न बाजार समिती विरोधात प्रकरण दाखल केले होते. सदर प्रकरण भंडारा न्यायालयाने रद्द केला. या विरोधात तुमसर नगरपरिषदेने भंडारा जिल्हा न्यायालयाला अपील केले. अपिल प्रलंबित असताना नगरपरिषदेने बाराद्वारेचे बांधकाम पाडायला सुरुवात केली होती. कृषी उत्पन्न बाजार समिती तुमसर, मोहाडी ते बाराकाटी बांधकाम तोडफोड प्रकरण थांबविण्याकरिता उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर मध्ये याचिका दाखल केली होती. बाजार समितीच्या वतीने अॅड.सुभाष पालीवाल व अॅड. सौमित्र पालीवाल यांनी बाजू मांडली. न्यायमूर्ती झेड.ए. हक यांनी तुमसर नगरपरिषदेला आदेश दिले की सुरु असलेले बांधकाम ताबडतोब थांबवावे. तसेच बांधकाम करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीयांची मंजुरी घेणे आवश्यक असल्याचे म्हटले. बाराद्वारीच्या जागेत जेवढे दुकाने व गाळे किरायाने यांचे लिखीत खाते तयार ठेवावे असे आदेशात म्हटले आहे. नगरपरिषद तुमसर कडून अॅड.महेश धात्रक यांनी काम बघितले. (तालुका प्रतिनिधी)
तोडफोडीच्या विरोधात स्थगनादेश
By admin | Updated: September 30, 2014 23:31 IST