शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

आयोगाच्या निर्णयाचा राष्ट्रवादीच्या गटनेतेपदावर परिणामाची शक्यता

By admin | Updated: May 29, 2014 23:30 IST

नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या नावाने ओळखले जाणारे पक्ष एकच आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या नावाने राजकीय पक्ष स्थापन करता येणार नाही,

राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय : अमरावतीत खल सुरूअमरावती :  नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या नावाने ओळखले जाणारे पक्ष एकच आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या नावाने राजकीय पक्ष स्थापन करता येणार नाही, या आशयाचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने दिला आहे. या निर्णयामुळे महापालिकेत काही महिन्यांपासून सुरू असलेल्या गटनेतेपदाच्या वादावर परिणाम होण्याची शक्यता आहे.महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंट या दोघांच्या गटनेते पदावरुन राजकारण तापलेले आहे. मुंबई येथील कुमार कमलेश कृपाशंकर श्रीवास्तव यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या नावाने राजकीय पक्षाच्या नोंदणीसाठी अर्ज केला होता. या प्रकरणाची सुनावणी करताना राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी २६ मे रोजी या नावाने पक्ष नोंदणी करता येणार नाही, हे स्पष्ट केले. श्रीवास्तव यांच्या व्यतिरिक्त  विनय परळीकर यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या नावाने राजकीय पक्ष नोंदणीसाठी अर्ज केला आहे. आयोगाने दिलेल्या निर्णयानुसार नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे दोन्ही एकाच नावाने ओळखले जातात. १४ वर्षांपासून नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी कार्यरत आहे. त्यामुळे या नावाने अन्य पक्षाची नोंद करता येणार नाही, असा स्पष्ट निर्णय दिला आहे. परिणामी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी याशिवाय दुसरा कोणताही पक्ष किंवा गट अस्तित्वात येऊ शकत नाही, असा दावा राकाँचे गटनेता सुनील काळे यांनी के ला आहे.