शहरं
Join us  
Trending Stories
1
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
2
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
3
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
4
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
5
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
6
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
7
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
8
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
9
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
10
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
11
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
12
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
13
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
16
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
17
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
18
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
19
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
20
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया

मेळघाटातील हजारो हेक्टर जमीन शासनाच्या ताब्यात

By admin | Updated: December 25, 2014 23:25 IST

मेळघाटातील भूमिहिनांना शासनामार्फत मिळालेल्या जमिनी वर्ग दोनमधून वर्ग एकमध्ये परावर्तित करून व्यावसायिकांनी ताब्यात घेऊन ले-आऊट पाडून विकण्याचा सपाटा लावला आहे.

अमरावती : मेळघाटातील भूमिहिनांना शासनामार्फत मिळालेल्या जमिनी वर्ग दोनमधून वर्ग एकमध्ये परावर्तित करून व्यावसायिकांनी ताब्यात घेऊन ले-आऊट पाडून विकण्याचा सपाटा लावला आहे. यासंदर्भात खा. आनंदराव अडसूळ यांनी तक्रार केल्याने विभागीय आयुक्तांनी याची दखल घेऊन त्रिसदस्यीय समिती नेमून चौकशीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. यामध्ये ३७५ हेक्टर जमीन पुन्हा वर्ग १मध्ये करण्यात आल्याचे नमूद आहे. यामधूनच सिडकोमार्फत विकास करण्याची मागणी खा. अडसूळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. चिखलदरा व धारणी तालुक्यातील जमिनी भोगवटदार वर्ग २ मधून १ मध्ये बेकायदेशीर रूपांतरित करून त्याची सर्रास विक्री केली जात होती. प्रॉप्रर्टी व्यावसायिकांनी जोरात खरेदी विक्रीचे व्यवहार सुरू केल्याची बाब स्थानिक शेतकरी शंकर खडके यांनी वनविभाग व महसूल विभागाच्या निदर्शनास आणून दिली. याची दखल घेत विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांनी त्रिसदस्यीय समितीचे गठण केले होते. त्यानुसार सर्वाधिक जमिनी चिखलदरा तालुक्यातील पर्यटन स्थळालगतच्या बिगर आदिवासी शेतकऱ्यांच्या ताब्यात असलेल्या एक हजार हेक्टर जमिनीची खरेदी-विक्री करून ले-आऊट पाडून प्लॉटची खरेदी विक्री जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील व्यक्तींनी बिल्डराव्दारे खरेदी केली होती. चौकशीदरम्यान असे प्रकार उघडकीस आले होते. मौजे शहापूर, आलाडोह, लवादा, मोथा, मडकी, मुसंडी व इतर वनग्राममधील जमिनी १९७२ चे कलम २७ अन्वये राखीव अ वर्ग अनारक्षित केलेल्या पूर्व मेळघाट वन विभागातील २० गावे व वन ग्रामांमधील ५३ गावे वन ग्रामांतून महसूल गावांमध्ये रूपांतरित केल्या आहेत. सन २००८ च्या उपविभागीय अधिकारी धारणी व सहायक निबंधक मुद्रांक व नोंदणी अचलपूर यांच्या पत्रान्वये या क्षेत्राच्या खरेदी-विक्री व्यवहारावर बंदी घालण्याचे आदेश दिले. परंतु त्यानंतरही जमिनी वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्याचे प्रकार सुरू होते. याला स्थगिती देऊन वर्ग १ मधील जमिनी वर्ग २ मध्ये करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी धारणी यांना देण्यात आले.