शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
5
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
6
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
7
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
8
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
9
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
10
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
11
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
12
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
13
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
14
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
15
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
16
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
17
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
18
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
19
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
20
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र

गौण खनिज तस्करांच्या ताब्यात

By admin | Updated: December 29, 2014 02:58 IST

तालुक्यातील नदी-नाल्याचे पात्र सध्या गौण खनिज तस्करांच्या ताब्यात असून अवैध उत्खनन करून वाहतूक करणाऱ्यांना तलाठी पकडत असताना ...

श्यामकांत पाण्डेय  धारणीतालुक्यातील नदी-नाल्याचे पात्र सध्या गौण खनिज तस्करांच्या ताब्यात असून अवैध उत्खनन करून वाहतूक करणाऱ्यांना तलाठी पकडत असताना ‘साहेबांच्या’ तोंडी आदेशाने सोडावे लागत असल्याचा अफलातून प्रकार सुरू आहे. तस्करांचे पूर्वीच साहेबांशी झालेल्या ‘सेटिंग’मुळे कनिष्ठ कर्मचारी रेती तस्करांना बेडी घालण्यास हतबल असल्याचे चित्र आहे.सध्या तालुक्यात रेती उत्खनन व वाहतूक बंद आहे. नवीन लिलाव प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सध्या रेतीवरील निर्बंध कायमच आहे. मात्र तालुक्यात २ हजार झोपडपट्टी, शेकडो पक्के घराचे बांधकाम, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनातील रपटे व पुलाचे बांधकाम, ठक्करबाप्पा योजनेचे सिमेंट काँक्रीट रस्ता व नाल्यांचे बांधकाम, बीआरजीएफचे काँक्रीट रस्त्यांचे बांधकाम युद्धस्तरावर सुरू आहे. या कामात रेती, डब्बर व मुरुमाचे मोठ्या प्रमाणावर वापर सुरू आहे. परंतु कोणताही अधिकृत वाहतूक परवाना नसताना धडाक्याने अवैधरीत्या रात्रीच्या पाळीत रेतीची वाहतूक सुरू आहे. धारणी शहरातील मोठमोठे बांधकामावर मध्यरात्री चोरट्या मार्गाने रेती येत आहे. बांधकामस्थळी रेतीची मोठमोठी ढिगारे लागली असून याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष चर्चिले जात आहे. आलेल्या रेतीची कोणतीच चौकशी होत नसल्याने शासनाला दररोज हजारो रूपयाचा महसुलापासून वंचित राहावे लागत आहे. याकडे तलाठ्याकडून एसडीओपर्यंत सर्वांचे कमालीचे दुर्लक्षच कारणीभूत ठरत आहे.प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत मोठ्या प्रमाणावर रेती व मुरूमाचा वापर सुरू आहे. मात्र गौण खनिज वाहून नेत असताना पकडण्यात आलेल्या वाहनाला सोडण्याचे फर्मान वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळत असल्याने कनिष्ठ कर्मचारी हतबल झाले आहेत. एकीकडे बैठकीत गौण खनिज चोरी पकडण्याचे फर्मान देणारेच नंतर पकडलेल्या वाहनावर कार्यवाही करू नका सोडून द्या अशा तोंडी आदेश मिळत असल्याने तलाठ्यांचे मानसिक खच्चीकरण होत आहे.