शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पोर्टल बंद, नाफेड केंद्राची वाटचाल थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2022 05:01 IST

नाफेडमार्फत चणा खरेदीला शासनाने मुदतवाढ दिल्यानंतर, २ जूनच्या रात्रीपासून संपूर्ण पोर्टल शासनाने बंद केल्याने, पुन्हा खरेदी बंद झाली. यामुळे नाफेडबाबत शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे. ३१ मेपर्यंत नोंदणी न झालेल्या शेतकऱ्यांकडून हरभरा खरेदी न झाल्याने शासनाने १८ जून अशी नवी तारीख दिली. तथापि, २४ मेचा कित्ता पुन्हा २ जून रोजी गिरविला गेला. पोर्टल बंद, तर खरेदी ठप्प झाली. ४२५ शेतकरी नोंदणी करून हरभरा विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : स्थानिक खरेदी-विक्री संघ अंतर्गत नाफेड केंद्रावर मुदतवाढीनंतर तालुक्यातील शेतकऱ्यांचा हरभऱ्याची खरेदी जोमात सुरू होती. परंतु, २ जून रोजी अचानक ऑनलाइन पोर्टल बंद पडल्यामुळे केंद्रावरील खरेदी बंद पडले आहे. जवळपास दोन ते अडीच क्विंटल हरभरा बाजार समितीच्या यार्डात खितपत पडून आहे.कित्येक शेतकऱ्यांनी दोन दिवसांपासून नावनोंदणी केली. परंतु, नाफेड केंद्रावर हरभऱ्याची विक्रमी आवक असल्यामुळे शेतकऱ्यांचा नंबर लागला नाही. आता कोणतीही पूर्वकल्पना न देता पोर्टल बंद करण्यात आले आहे. शेतकरी झाले सोकारी शेतकऱ्यांनी भाड्याच्या गाडीत विक्रीसाठी आणलेला हरभरा जागच्या जागीच उभ्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त  भाड्याचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे, शिवाय येथे शेतकऱ्यांना आपल्या मालाची दिवसरात्र सोकारी करावी लागत आहे. पावसाची भीतीकोणत्याही क्षणी पावसाने हजेरी लावल्यास उघड्यावर असलेल्या शेतमालाचे काय होणार, या चिंतेने शेतकरी हवालदिल झाला आहे. शासनाने लवकरात लवकर पोर्टल सुरू करावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. 

नाफेडबाबत शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप

अंजनगाव सुर्जी : नाफेडमार्फत चणा खरेदीला शासनाने मुदतवाढ दिल्यानंतर, २ जूनच्या रात्रीपासून संपूर्ण पोर्टल शासनाने बंद केल्याने, पुन्हा खरेदी बंद झाली. यामुळे नाफेडबाबत शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे. ३१ मेपर्यंत नोंदणी न झालेल्या शेतकऱ्यांकडून हरभरा खरेदी न झाल्याने शासनाने १८ जून अशी नवी तारीख दिली. तथापि, २४ मेचा कित्ता पुन्हा २ जून रोजी गिरविला गेला. पोर्टल बंद, तर खरेदी ठप्प झाली. ४२५ शेतकरी नोंदणी करून हरभरा विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत. नाफेड केंद्रावरून मालवाहू गाड्यांमध्ये शेतकऱ्यांनी आणलेला माल शेतकऱ्यांना परत घरी न्यावा लागला, त्यामुळे मालवाहू गाडीचे गाडीभाडे शेतकऱ्यांच्या माथी बसले. यापूर्वी बारदान्याअभावी नाफेडचे चणा खरेदी केंद्र तब्बल वीस दिवस बंद होते. अतिशय कमी दरात अनेक शेतकऱ्यांनी आपला माल बाजारात विकून टाकला. आता पुन्हा पोर्टल बंद असल्याने आणि खरिपाची पेरणी जवळ आल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.  

मी दोन दिवसांपूर्वी नावनोंदणी केली. माझा नंबर लागणारच होता की, पोर्टल बंद पडले. आता खरेदी केव्हा सुरू होणार, हे निश्चित नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच दैना होणार आहे. शेतकऱ्यांच्या या महत्त्वाच्या प्रश्नाविषयी सर्वच लोकप्रतिनिधींनी शासनाकडे आवाज उठवावा. - सुरेंद्र मांडवगणे, शेतकरी, शेंदोळा खुर्द

केंद्र शासनाला अचानक पोर्टल बंद करायचे होते, तर अतिरिक्त नावनोंदणी करण्याची गरज नव्हती. नाफेड केंद्रावर बारदान्याचा तुटवडा आहे. तेव्हा पोर्टल सुरू करण्याआधी बारदाना उपलब्ध करून देण्यात यावा, अन्यथा पोर्टल सुरू होऊन काहीच उपयोग होणार नाही.- गजानन अळसपुरे, अध्यक्ष, खरेदी-विक्री संघ, तिवसा

शेतमाल भरून आमच्या गाड्या बाजार समिती आवारात उभ्या आहेत. उभ्या गाडीचे शेतकऱ्यांकडून आम्हाला अर्धे भाडे मिळेल. परंतु, दोन दिवसांपासून एकाच जागेवर गाड्या उभ्या असल्याने हवेचा दाब तयार होऊन गाडीचे टायर फुटण्याची दाट शक्यता आहे.- संजय वऱ्हाडे, गाडीमालक,वणी ममदापूर.

 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रMarketबाजार