माहेरच्यांचा आरोप : सीआयडी चौकशीची मागणीमोर्शी : पूनम त्रिवेदी हिची आत्महत्या नसून तिची हत्याच करण्यात आल्याचा आरोप पूनम त्रिवेदी हिच्या माहेरच्या मंडळींनी केला असूून या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.येथील धर्मपाल तिवारी यांची मुलगी पूनम ही तलाठी म्हणून तळणी-पिंपळखुटा येथे कार्यरत होती. तत्पूर्वी तिने चंद्रपूर जिल्ह्यात नोकरी केलेली आहे. कोणत्याही दबावाला बळी न पडता आणि संकटाला सामोरे जावून आपले कर्तव्य बजावणाऱ्या म्हणून त्यांची ख्याती होती. ३ जानेवारीला तिचे लग्न अमरावती येथील अभिजीत त्रिवेदी यांच्याशी पार पडले. अवघ्या २४ दिवसात तिचे निधन झाल्याची खबर माहेरकडील मंडळींना प्राप्त होताच ते हतबल झाले. घटनेची माहिती मिळताच पूनमचे आई, वडील आणि मामा तळणी पिंपळखुटा येथे पोहचले. त्यांनी पूनमने ज्या बाथरुम मध्ये गळफास घेतल्याचे दर्शविण्यात आले तेथेही भेट दिली. या बाथरुमला ८ फूट उंचीवर व्हेंटीलेटर आहे. पूनमची उंची कमी होती. शिवाय तिने गळफास घेतला असता तर सिमेंटची जाळी तिच्या वजनाने तुटून पडली असती. ज्या खुर्चीवर चढून तिने गळफास घेतल्याचे दाखविण्यात आले. मात्र बाथरूममधील पाण्याने भरलेली बकेट अगदी दारालगत असताना त्यातील पाणीही सांडू का शकले नाही, असा प्रश्न तक्रारकर्त्यांनी उपस्थित केला आहे.
पूनम त्रिवेदीची आत्महत्या नसून हत्याच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2016 00:21 IST