शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गाच्या नालीच्या पाण्याने शेतांचे झाले तळे

By admin | Updated: June 22, 2015 00:10 IST

जिल्ह्यात दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे. महामार्गावरील पावसाचे पाणी निघून जाण्यासाठी दुतर्फा मातीच्या नाल्या काढल्या आहेत.

नाल्यात सोडावे पाणी : पेरणी कशी करावी? शेतकरी चिंतेतअमरावती : जिल्ह्यात दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे. महामार्गावरील पावसाचे पाणी निघून जाण्यासाठी दुतर्फा मातीच्या नाल्या काढल्या आहेत. परंतु त्या सदोष आहेत, त्यांची टोके नालीत काढण्यात आलेली नाही. त्यामुळे नालीचे पाणी घुसून रातोरात शेताचे तळे होत असल्याने शेतात पेरणी कशी करावी, याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.अमरावती-तिवसा दरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले. महामार्गावर पडणारे पाणी निघून जाण्यासाठी नाल्या खोदण्यात आल्या आहेत. याच नाल्यालगत पुन्हा केबल टाकण्यासाठी खोदण्यात आल्यामुळे नाल्या बुजल्या आहे व पावसाचे पाणी सरळ लगतच्या शेतात शिरत आहे. शिवणगाव ते तिवसादरम्यान पहिल्याच पावसात अनेक शेतात पाणी शिरले असल्याने शेतात तळे साचले आहे. अशीच स्थिती राहिल्यास शेतात पिके घेणे कठीण होणार आहे. मुळात महामार्गाच्या दुतर्फा केबलसाठी नाल्या खोदल्या असताना पाणी काढणाऱ्या नाल्या बुजल्या जाणार नाही याची काळजी महामार्ग विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी घेतली नसल्याने शेतकऱ्यांवर बिकट प्रसंग ओढावला आहे. किंबहुना महामार्गाची देखभाल दुरूस्ती करणाऱ्या आयआरबी कंपनीने देखील केबलसाठी नाल्या खोदल्या जात असताना दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर सध्या ओढवलेल्या बिकट प्रसंगासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासोबतच आयआरबी कंपनी व केबलसाठी नाल्या खोदणारे कंत्राटदार तेवढेच जबाबदार असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. (प्रतिनिधी)