शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

उन्हात फुलोराच्या जतनासाठी डाळिंबाच्या झाडाचे गाठोडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 01:16 IST

कमी पावसाचे पीक म्हणून डाळिंबाची गणना होत असली तरी सध्याचा भडकलेला पारा झाडांची रया घालवत आहे. त्यामुळे पुढील पावसाळ्यापर्यंत या पिकाचे संरक्षण करण्यासाठी तिवसा तालुक्यातील शेतकरी या झाडांचे गाठोडे बांधत आहेत.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची शक्कल । उत्पादकतेवर परिणाम होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कगुरुकुंज मोझरी : कमी पावसाचे पीक म्हणून डाळिंबाची गणना होत असली तरी सध्याचा भडकलेला पारा झाडांची रया घालवत आहे. त्यामुळे पुढील पावसाळ्यापर्यंत या पिकाचे संरक्षण करण्यासाठी तिवसा तालुक्यातील शेतकरी या झाडांचे गाठोडे बांधत आहेत.तिवसा तालुक्यातील माळेगाव, कापूसतळणी या गावाचा परिसर खडकाळ व मुरमाड असून, त्या जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी आहे. त्यामुळे पारंपरिक पिकासोबत डाळिंब पिकाचेही उत्पादन या परिसरातील शेतकरी घेतात.    उन्हाळी हंगामात फेब्रुवारी ते मे या चार महिन्यात पिकास नियमित व एकसारखे पाणी देणेगरजेचे असते. यासाठी ठिबक सिंचनाद्वारे पूर्ण वाढलेल्या झाडास फेब्रुवारी ते मे मध्ये क्रमाने अंदाजे २३ ते ५० लिटर पाणी प्रत्येक झाडास रोज देणे गरजेचे असते. अनियमितता झाल्यास फूलगळतीचे प्रमाण वाढते व त्याचा उत्पादनावर विपरित परिणाम होतो. पाण्याचा अभाव असणाºया फळबागांमध्ये उन्हाळी हंगामात काळ्या रंगाच्या पॉलिथीन पेपरने किंवा उसाच्या पाचटाच्या सहाय्याने आच्छादन केल्यास झाडाजवळ ओलावा टिकून राहण्यास मदत होते. पण, तिवसा तालुक्यातील कापूसतळणी भागातील शेतकऱ्यांनी चक्क कापडाचे संरक्षण उभारले आहे. सेंद्रिय खतांचा वापर अधिक केल्यास जमिनीतील पाणी धरून ठेवण्याच्या क्षमतेत वाढ होते. पण, त्याची उपलब्धता कमी आहे. तालुक्यात बहुतेक ठिकाणी डाळिंब, संत्रा या पिकासाठी ठिबक सिंचनाची सोय शेतकºयांनी केली.