शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

निधी परतीची स्थायी समितीत पोलखोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 22:20 IST

जिल्हा परिषदेकडील अखर्चित निधी परत करण्याचे आदेश राज्य शासनाने मागील वर्षी बजाविले होते.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : सदस्यांनी विचारला प्रशासनाला जाब

आॅनलाईन लोकमतअमरावती : जिल्हा परिषदेकडील अखर्चित निधी परत करण्याचे आदेश राज्य शासनाने मागील वर्षी बजाविले होते. त्यावर समाजकल्याण विभागाने सन २०१६-१७ या चालू आर्थिक वर्षातील दलितवस्ती योजनेचे ४० कोटीच परत पाठविल्याची धक्कादायक बाब सदस्य सुहासिनी ढेपे, रवींद्र मुंदे यांनी शुक्रवारी जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत उघडकीस आणली.जिल्हा परिषद सभागृहात ही गंभीर बाब चर्चेला येताच काँग्रेसचे गटनेते बबलू देशमुख यांनी चौकशीची मागणी केली. यावर प्रशासनाने मात्र असा प्रकार झाला नसल्याचे सभागृहात सांगितले. परंतु, तथ्य तपासणीचे निर्देश अध्यक्ष नितीन गोंडाणे यांनी सीईओंना दिले. त्यानुसार या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असे सीईओ के.एम अहमद यांनी सभागृहाला सांगितले.जिल्हा परिषदेला सन २०११ ते २०१५-१६ पर्यंत विविध योजनांसाठी आलेला अखर्चित निधी शासनदरबारी जमा करण्याचे आदेश मागील वर्षी शासनाने दिले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेचा जवळपास शंभर कोटींचा अखर्चित निधी शासनाकडे जमा करण्यात आला. यात समाजकल्याण विभागाने विविध योजनांचे अखर्चित ५० कोटी जमा केले. मात्र, हा निधी जमा करताना दलितवस्ती सुधार योजनेचा पंचायत समिती स्तरावरील अखर्चित निधी परत आला नसताना, जिल्हास्तरावर अंदाजे ताळमेळ करून सन २०१६-१७ मधील या चालू आर्थिक वर्षातील ४० कोटी रुपये शासनाकडे परत पाठविल्याची बाब सुहासिनी ढेपे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणली. निधी परत करताना पंचायत समित्याकडील जमा-खर्चाचा ताळमेळ लागत नसल्याने विकासनिधीत अडचण झाली आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केली. सभेत मेळघाटातील शौचालय बांधकामाची सक्ती, घरकुलाचे अनुदान आणि वंचित लाभार्थी यांच्या मुद्द्यावर महेंद्रसिंह गैलवार यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे, सभापती जयंत देशमुख, बळवंत वानखडे, वनिता पाल, सुशीला कुकडे, काँग्रेसचे गटनेते बबलू देशमुख, विरोधी पक्षनेता रवीेंद्र मुंदे, बाळासाहेब हिंगणीकर, महेंद्रसिंह गैलवार, सुनील डिके, अभिजित बोके, सुहासिनी ढेपे, प्रियंका दगडकर, सीईओ के.एम अहमद, विनय ठमके, डेप्युटी सीईओ कै लास घोडके, कॅफो रवींद्र येवले व सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.दोषींचा मुलाहिजा नकोचनांदगाव खंडेश्वर तालुक्यातील अडगाव, मांजरी म्हसला या ठिकाणी विहिरीच्या कामात अनियमितता झाल्याची बाब दोन्ही चौकशी समित्यांपुढे आली आहे. त्यानुसार दोषींवर कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न सुहासिनी ढेपे यांनी उपस्थित केला. यावर योग्य कारवाई करण्याचे आश्वासन सीईओंनी दिले. याशिवाय सौरदिवे व मेळघाटात काही ग्रामपंचायत स्तरावर राबविण्यात आलेल्या योजनांमध्ये झालेल्या गैरप्रकारातील दोषींवर नियमानुसार कारवाई करावी. यात कुणाचाही मुलाहिजा करू नये, अशी भूमिका काँग्रेसचे गटनेता बबलू देशमुख यांनी सभागृहात अधिकाºयांनासमोर मांडली.