शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
6
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
7
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
8
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
9
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
10
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
11
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
12
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
13
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
14
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
15
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
16
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
17
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
18
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
19
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
20
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे 17 संचालकांसाठी आज मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2021 05:00 IST

जिल्हा उपनिबंधकांच्या नियंत्रणात ही निवडणूक प्रक्रिया पूर्णत्वास आणण्यासाठी जोरदार तयारी  करण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यात १४ ठिकाणी मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान मतदान करता येणार आहे. १७ संचालक पदांसाठी ४८ उमेदवार रिंगणात आहेत. सहकार विरुद्ध परिवर्तन पॅनल अशी थेट लढत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १७ संचालकपदांच्या निवडीसाठी सोमवार, ४ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. जिल्हा बँकेत २१ संचालक असून, अगोदर चार संचालक बिनविरोध निवडून आले आहेत, हे विशेष. जिल्हा उपनिबंधकांच्या नियंत्रणात ही निवडणूक प्रक्रिया पूर्णत्वास आणण्यासाठी जोरदार तयारी  करण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यात १४ ठिकाणी मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान मतदान करता येणार आहे. १७ संचालक पदांसाठी ४८ उमेदवार रिंगणात आहेत. सहकार विरुद्ध परिवर्तन पॅनल अशी थेट लढत आहे. सहकार क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव असलेले काही उमेदवार अपक्ष म्हणून शड्डू ठोकून आहेत. त्यामुळे तालुका सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत मतदारांनी काही चमत्कार केल्यास आश्चर्य वाटू नये, अशी जोरदार चर्चा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला रंगली आहे. ५ ऑक्टोबर रोजी मतमाेजणी होणार आहे.आठ टेबलवरून ही मतमोजणी होणार आहे. यासाठीचे नियोजन बँकेच्या निवडणूक विभागाद्वारा करण्यात आल्याची माहिती आहे.

दिग्गजांच्या लढतीकडे लक्षचांदूर बाजार तालुक्यातून ना. बच्चू कडूविरुद्ध काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, दर्यापुरातून आमदार प्रकाश भारसाकळेविरुद्ध सुधाकर भारसाकळे, अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातून आ.बळवंत वानखडेविरुद्ध आमदार राजकुमार पटेल व ओबीसी प्रवर्गातून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख विरुद्ध राकाँचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके यांच्यात थेट लढत होत आहे. महिला मतदारसंघातून सुरेखा ठाकरे, निवेदिता चौधरी, मोनिका वानखडे, माया हिवसे, जयश्री देशमुख, वैशाली राणेंची उमेदवारी लक्षवेधक ठरत आहे

सेवा सहकारी सोसायटीच्या मतदारांसाठी पांढरी मतपत्रिका१४ पैकी चार सेवा सहकारी सोसायटीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. आता १० संचालक पदांसाठी निवडणूक होत आहे. सेवा सहकारी सोसायटीच्या मतदारांसाठी पांढऱ्या रंगाची मतपत्रिका असतील. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातून अभिजित ढेपे, तिवसा सुरेश साबळे, वरूड तालुक्यातून नरेशचंद्र ठाकरे, धारणीतून जयप्रकाश पटेल हे चार संचालक बिनविरोध घोषित झाले. अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी फिक्कट निळी, व्हीजेएनटीसाठी पिवळी, महिला राखीव मतदारांसाठी गुलाबी, ओबीसी मतदारांसाठी फिक्कट हिरवी, ‘क’ निर्वाचन क्षेत्रासाठी केसरी, ‘क’ निर्वाचनसाठी पाेपटी मतपत्रिका.

मतदान केंद्रेअमरावतीत जिल्हा परिषद गर्ल्स हायस्कूल, दर्यापुरात जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, अचलपुरात जिल्हा परिषद माध्यमिक शाळा,चांदूर रेल्वे येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, अंजनगाव सुर्जी येथील राधाबाई सारडा महाविद्यालय, धामणगाव रेल्वे येथील हिराबाई गोयनका कन्या विद्यालय, नांदगाव खंडेश्वर येथील राजाभाऊ देशमुख महाविद्यालय, चांदूर बाजार येथील जिजामाता विद्यालय, चिखलदरा येथील गिरी सहकारी संस्था, वरूड येथील ऑरेंज सिटी कॉन्व्हेंट, मोर्शी येथील भारती महाविद्यालयात मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत.

 

टॅग्स :bankबँकElectionनिवडणूक