शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

मुस्लीमबहुल भागात तणावपूर्ण वातावरणात मतदान

By admin | Updated: February 22, 2017 00:09 IST

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मुस्लिमबहुल भागात तणावपूर्ण वातावरणात मंगळवारी मतदानप्रक्रिया पार पडली.

केंद्रांना पोलीस छावणीचे स्वरुप : उमेदवारांचे समर्थक आमने-सामनेअमरावती : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मुस्लिमबहुल भागात तणावपूर्ण वातावरणात मंगळवारी मतदानप्रक्रिया पार पडली. परिसरातील काही केंद्रांना पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. मुस्लिम परिसरातील मतदानकेंद्रांवर मतदानासाठी यंदा महिलांची गर्दी सुद्धा लक्षणीय ठरली.मंगळवारी सकाळी ७.३० पासून मतदानास प्रारंभ झाला. सकाळी ८ ते १० दरम्यान मुस्लिमबहुल भागातील मतदान केंद्रांवर बऱ्यापैकी गर्दी होती. मात्र ११ ते १ दरम्यान ही गर्दी ओसरली. पुन्हा २ वाजतानंतर गर्दी बघावयास मिळाली. महापालिका, पोलीस प्रशासन दप्तरी संवेदनशिल आणि अतिसंवेदनशील अशी नोंद असणाऱ्या मतदानकेंद्रांवर सोमवारी रात्रीपासूनच राज्य राखीव दलाची तुकडी तैनात करण्यात आली होती. मुस्लिम व हिंदू वस्त्यांच्या सीमेवरील मतदानकेंद्रांना प्रशासनाने लक्ष्य केले होते. मुस्लिमबहुल भागात जमील कॉलनी, छायानगर व अलिमनगर यातीन प्रभागात १२ जागांसाठी एकूण ...मुस्लिम सदस्य रिंगणात आहेत. या भागात सहा मतदानकेंद्र संवेदनशिल असून यात जमील कॉलनीस्थित महापालिका शाळा, गवळीपुरा येथील अ‍ॅकेडेमिक हायस्कूल, शासकीय विद्यानिकेतन, रतनगंज येथील हिंदी प्राथमिक शाळा, असोसिएशन बॉईज हायस्कूल व अल्लामा इंग्लिश स्कूलचा समावेश आहे. पोलीस प्रशासनाने शेख जफर विरुद्ध सोहेल बारी, आसिफ तव्वकल विरुद्ध गफफार राराणी, अहमद पत्रकार, अब्दुल रफिक व एजाज पहेलवान यांच्यातील लढत तर इमरान अशरफी विरुद्ध अफजल हुसेन या तुल्यबळ उमेदवारांच्या लढतीकडे लक्ष ठेऊन होते. मतदारांना आमिष दाखविल्याप्रकरणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. जमील कॉलनी महापालिका शाळेच्या बाहेर दुपारी काही उमेदवारांचे समर्थक समोरासमोर आले होते. पण, पोलीस पोहोचताच कोणीही दिसून आले नाही. यापरिसरात कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. काँग्रेस, एमआयएम, समाजवादी पार्टी, बसपा, युवा स्वाभिमान पार्टी, मुस्लिम लिग, राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये जोर दिसून आला. सायंकाळी ४ वाजेनंतर मतदानकेंद्रांवर एकच गर्दी उसळली होती. परिसरात स्थिती नियंत्रणात ठेवताना पोलिसांची मात्र चांगलीच दमछाक झाल्याचे दिसून आले. मुस्लीम भागातील मतदार यादीत त्रुटी मुस्लिमबहुल भागातील तीन प्रभागातील मतदारयादीत प्रचंड त्रुटी असल्याची ओरड मतदारांनी अधिकाऱ्यांकडे केली आहे. झोननिहाय मतदारयादी तयार करताना एका प्रभागातील नावे दुसऱ्या प्रभागात जोडताना अनेक नावे भलत्याच प्रभागात गेल्याचे दिसून आले. व्हॉट्सअप किंवा महापालिका वेबसाईटवरही मतदारयादी सदोष असल्याची ओरड नागरिकांनी केली आहे. मतदारयादीत त्रुटी असल्याने मुस्लिमबहुल भागातील मतदारांना मतदानापासून वंचित रहावे लागल्याचा आरोप अब्दुल रफिक, सलिम खान यांनी केला आहे.