शहरं
Join us  
Trending Stories
1
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
2
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
3
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
4
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
5
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
6
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
7
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
8
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
9
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
10
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
11
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
12
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

‘अमृत’ला राजकीय पाठबळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2016 00:53 IST

सुरक्षा रक्षकांसह अन्य कंत्राटी कर्मचाऱ्यांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या दोन्ही कंत्राटी एजन्सींना

महापालिकेतील लालफीतशाही: आज येणार चौकशी अहवाल अमरावती : सुरक्षा रक्षकांसह अन्य कंत्राटी कर्मचाऱ्यांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या दोन्ही कंत्राटी एजन्सींना राजकीय पाठबळ लाभले आहे. राजकीय वरदहस्तामुळे फसवणुकीचा हा गोरखधंदा बिनबोभाट सुरू आहे. राजकीय व्यक्तींच्या आडोशाने स्वत:ला सुरक्षित करण्याचा डाव ‘अमृत’सह अन्य कंत्राटदार एजन्सीने रचला आहे. दरम्यान ‘अमृत’ने चालविलेल्या ‘पीएफ’सह अन्य कपातींसंदर्भातील चौकशी अहवाल मंगळवारी आयुक्तांसमोर येण्याची शक्यता आहे. पालिकेला सुरक्षारक्षक पुरवित असताना अन्य कोणत्याही सुविधा न पुरवता ‘अमृत’ची देयके राजकीय आशिर्वाद आणि विशिष्ट लोकांशी जोपासलेल्या आर्थिक हितसंबंधामुळे ‘पास’ होतात. सुरक्षा रक्षकांना ना काठी, ना शिटी, ना ड्रेस अशी परिस्थिती असताना कपात मात्र ४९ टक्क्यांच्या आसपास केली जाते. ‘अमृत’कडून होणाऱ्या लुबाडणुकीबाबत अनेक नगरसेवकांनी प्रश्न उपस्थित केले. मात्र, राजकीय आशीर्वादामुळे त्या प्रश्न वा प्रस्तावावर चर्चाच होऊ शकली नाही. ‘अमृत’ मधील पदाधिकाऱ्यांसह अन्य काही जण राजकीय नेत्यांच्या दावणीला बांधले गेले आहेत. एका विशिष्ट भागात राहणाऱ्या व्यक्तींचा सुरक्षारक्षक म्हणून समावेश आहे. जे प्रत्यक्षात काम करतात, ते कोणाकडून आले, यावर कुणाचाही आक्षेप नाही. मात्र, सुरक्षारक्षकांना मिळणाऱ्या मानधनातून कुणीही राजकीय पोळी शेकू नये, असा सांघिक सूर महापालिकेत उमटला आहे. कामगार संघटनांचे मौन ४मानधन तत्वावर कार्यरत कंत्राटी कामगार-कर्मचाऱ्यांची आर्थिक नाडवणूक होत असताना कामगार-कर्मचारी संघटनांनी बाळगलेले मौन संताप आणणारे आहे. महापालिकेतच अनेक कर्मचारी संघटना आहेत. त्यांना पुढारीही आहेत. मात्र, डोळ्यांदेखत आपल्या सहकारी कामगारबांधवांचे आर्थिक शोषण होत असताना कुठलीही संघटना समोर आलेली नाही. अन्य मुद्यांवर गळे काढणाऱ्या संघटना कंत्राटी कर्मचारी, सुरक्षा रक्षकांच्या आर्थिक लुटीबाबत गप्प का? असा सवाल महापालिका वर्तुळातून उपस्थित करण्यात आला आहे. यावर कामगार संघटनांचे मौनही सूचक आहे.