शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महिला उमेदवारांच्या शोधासाठी राजकीय पक्षांची कसरत

By admin | Updated: August 5, 2016 00:13 IST

डिसेंबर महिन्यात होऊ घातलेल्या जिल्ह्यातील ९ नगरपरिषदांच्या आगामी निवडणुकीत ५० टक्के जागांवर महिला उमेदवारांना संधी मिळणार आहे.

यजमानांद्वारेच ब्रांडिंग : अभ्यासू महिलांना मिळावी संधी जितेंद्र दखने अमरावती डिसेंबर महिन्यात होऊ घातलेल्या जिल्ह्यातील ९ नगरपरिषदांच्या आगामी निवडणुकीत ५० टक्के जागांवर महिला उमेदवारांना संधी मिळणार आहे. मात्र, सर्व पक्षांमध्ये महिलांचा सक्रिय सहभाग अत्यल्प आहे. राजकीय पक्षांच्या महिला आघाडी व्यतिरिक्त अन्यत्र महिला मुख्य प्रवाहात नाहीत. म्हणून यावेळी निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांना राजकीयदृष्ट्या सक्षम, अभ्यासू व धाडसी महिला उमेदवार शोधण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. ५० टक्के जागा राखीव असल्याने मागील निवडणुकीत ज्या महिलांना संधी मिळाली होती त्यापैकी अभ्यासू महिला नगरसेविका बोटावर मोजण्याइतक्याच आहेत. सभागृहामध्ये साडेचार वर्षे पुरुषप्रधान संस्कृतीचाच बोलबाला राहिला आहे. वारंवार हे चित्र समोरही आले. यामुळे ५० टक्के आरक्षण देण्यामागचा शासनाचा हेतू अद्यापही साध्य झालेला नाही. महिला आरक्षणाचे संकेत लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी महिला राखीव आरक्षण निघाल्यास नगरपालिकेत महिलांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक होणार आहे. असे असल्यास राजकीय पक्षांकडून काय भूमिका घेतली जाते याबाबत उत्सुकता आहे. महिला उपेक्षित प्रमुख राजकीय पक्षांमध्ये अभ्यासू व धाडसी महिला असल्या तरी त्या पाठबळाअभावी अपेक्षित आहेत. महिला नगरसेवकांना त्यांचे पतीराजच पुढे आणत नसल्याचे जाणवते. केवळ निवडणुकीच्या प्रचारातच त्यांना समोर आणले जाते असा सूर आहे.