शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

पती-पत्नीच्या भांडणात राजकीय रंग

By admin | Updated: January 14, 2016 00:19 IST

येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुंभीवाघोली येथे अवैध दारु विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या महिलेचा पतीसोबत कडाक्याचे भांडण झाले.

कुंभी वाघोलीचे प्रकरण संशयास्पद : बयानात तफावतपथ्रोट : येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुंभीवाघोली येथे अवैध दारु विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या महिलेचा पतीसोबत कडाक्याचे भांडण झाले. परंतु या भांडणाला राजकीय रंग दिल्याने पोलिसांविरुद्ध तक्रार झाल्याने संपूर्ण प्रकरणच संशयास्पद ठरले. कुंभी वाघोली येथे वास्तव्यास असणारे पती-पत्नीची पूर्ण पार्श्वभूमी ही अपराधिक स्वरुपाची आहे. याची कल्पना सर्वदूरपर्यंत पसरलेली आहे. ही महिला सात वर्षा अगोदर वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वायगाव येथे मजुरीसाठी गेली होती. त्याठिकाणी तिने स्वत:वर बलात्कार झाल्याची तक्रार देऊन प्रकरण अंगलट येताच बयाण बदलविलेले होते. त्यानंतर चार वर्षापूर्वी पती-पत्नीच्या भांडणात तिला पतीने जबर मारहाण करुन पेटवून दिले होते. त्यात ती पंचवीस टक्के जळाली. १० जानेवारी रोजी ११.३० वाजता तिने पोलिसांनी मारहाण करुन जाळण्याचा प्रयत्न केला असल्याबाबतची तक्रा पोलीस ठाण्यात दिली. संध्याकाळी साडेसहा वाजता सदरची घटना घडली असताना रात्री ११.३० पर्यंत पोलिसांना माहिती न देणे, दरम्यान तालुक्यावरुन राजकीय संघटनेचे पदाधिकाऱ्यांना बोलविणे, थेट पोलिसांवर आरोप लावणे असा प्रकार घडल्याने गावकऱ्यांच्या आणि पिडीत महिलेच्या बयाणाबाबत माहिती घेतली असता त्यांच्यात प्रचंड तफावत आढळून आली. ही महिला अवैध दारुचा व्यवसाय करीत असल्याने पोलिसांनी तिच्यावर वारंवार कारवाई करुन तिला व्यवसाय न करण्यास बजाविले होते. या त्रासाला कंटाळून तिने त्या पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध लेखी तक्रार पोलीस ठाण्यात दिली. परंतु घडलेल्या प्रकरणाने पोलिसांसह संपूर्ण गावच अवाक झाले. १० जानेवारी रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता ती घरात स्वयंपाक करीत असताना एक पोलीस व त्याच्या सोबत दोन अनोळखी तोंडाला रुमाल बांधून घरात शिरले. त्यावेळी घरात मी एकटीच होती. तेव्हा तू दारु विकते, आम्ही जप्त करण्यास आलो. तू वाईट काम करते, असे सांगून मला मारहाण करीत घरातील सामानांची फेकफाक केली. दारु न मिळाल्याने संतापून त्यांनी रॉकेल ओतून मला जाळण्याचा प्रयत्न केला. पण मी त्यांच्या जवळून रॉकेलची डबकी व माचीस हिसकावली तेव्हा ते पळून गेले. त्यानंतर माझे पती घरी आल्यावर त्यांनी मी हकीकत सांगितली. एवढा भयंकर प्रकार घडल्यावर चार ते पाच तासापर्यंत पोलीस स्टेशनला तक्रार न देणे, राजकीय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून पोलिसांना माहिती कळविणे त्यामुळे हा संपूर्ण प्रकारच संशयास्पद ठरला आहे. (वार्ताहर)