शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांची तटबंदी

By admin | Updated: September 22, 2016 00:11 IST

मराठा समाजाच्या गुरुवारी काढण्यात येणाऱ्या मोर्चाला सुरक्षा प्रदान करण्यासाठी शहर पोलिसांनी जोरदार तयारी केली आहे.

अमरावती : मराठा समाजाच्या गुरुवारी काढण्यात येणाऱ्या मोर्चाला सुरक्षा प्रदान करण्यासाठी शहर पोलिसांनी जोरदार तयारी केली आहे. बुधवार सायंकाळपासूनच पोलिस रस्त्यावर उतरले आहेत.या मोर्चासाठी १ हजार २३८ पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात आहेत.गुरूवारी नेहरु मैदानातून मराठा मूकमोर्चा निघणार आहे. या मोर्चात सुमारे ५ लाख मराठा समाज बांधव सहभागी होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. हा मोर्चा नेहरु मैदान, राजकमल चौक, शाम चौक, जयस्तंभ चौक, मालवीय चौक, इर्विन चौक, गर्ल्स हायस्कूल चौकमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचणार असून त्याकरिता पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार आहे. त्याचप्रमाणे इर्विन चौकात उडणारा अश्वपुतळा बसविण्यात येणार आहे. अश्वाच्या पुतळा बसविण्यास काही नागरिकांनी विरोध दर्शविला असून त्या अनुषंगाने विविध आंदोलने झाली आहेत. त्यामुळे या मोर्चात समाजविघातक घटकांकडून अनुचित प्रकार घडवून आणण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने शहर पोलीसांनी ९ सेक्टर तयार केले आहेत.सेक्टरनुसार पोलीस बंदोबस्तसेक्टर १ मध्ये नेहरु मैदानाच्या आतील भागात बंदोबस्त लावण्यात येईल.सहायक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील यांच्या नेत्तृत्वात पोलीस निरीक्षक पाटील, दोन एपीआय व पीएसआय व २० पोलीस कर्मचारी तैनात राहणार आहेत. सेक्टर २ मध्ये पाच पोलीस निरीक्षक, १२ एपीआय व पीएसआय, १५० पोलीस कर्मचारी व ५० महिला पोलीस कर्मचारी नेहरू मैदान प्रवेशद्वारापासून राजकमल चौक, शाम चौक, जयस्तंभ चौक, मालवीय चौक व इर्विन चौकापर्यंतचा बंदोबस्त ठेवणार आहे. सेक्टर ३ मध्ये सहायक पोलीस आयुक्त अनिल पंडागळे यांच्या नेतृत्वात चार पोलीस निरीक्षक, ८ एपीआय व पीएसआय, १२० पोलीस कर्मचारी, ४० महिला पोलीस इर्विन चौक, ज्ञानमाता टी-पॉर्इंट, जोग बंगला, गर्ल्स हायस्कूल चौकापर्यंत बंदोबस्त ठेवणार आहे. अशाप्रकारे सेक्टरनुसार पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केलेले आहे. पाच ‘वॉच टॉवर्स’वरील बंदोबस्तअमरावती : पाच ‘वॉच टावर्स’वरील बंदोबस्तात प्रत्येकी १ पोलीस उपनिरीक्षक व तीन पोलीस कर्मचारी तैनात राहणार आहेत. या पोलिसांजवळ वॉकीटॉकी व एक दुर्बिण देण्यात येणार असून ते इर्विन चौक व गर्ल्स हायस्कूल चौकापर्यंत लक्ष केंद्रीत करणार आहे. ‘सबलेन’ बंदोबस्त ‘सबलेन’ बंदोबस्तात सेक्टरमधील सबलेनमध्ये बॅरिकेटसजवळ १ शहर वाहतूक शाखेचा कर्मचारी, १ इतर कर्मचारी व पेट्रोलिंगसाठी दोन कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. यामध्ये खापर्डे बगिचाकडून येणारा मार्ग, होलीक्रॉस शाळेकडून येणारा मार्ग, बारब्दे हॉस्पीटलकडून येणारा मार्ग, टोपेनगराकडून येणारा मार्ग व आयएमए हॉलकडून येणाऱ्या मार्गावर ४० पोलीस कर्मचारी तैनात राहणार आहेत.