शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस महिलेची फसवणूक, लैंगिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:03 IST

पहिले लग्न लपवून महिला पोलिसासोबत दुसरा विवाह केला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

गुन्हे दाखल करण्यास दिरंगाई : गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील घटनाअमरावती : पहिले लग्न लपवून महिला पोलिसासोबत दुसरा विवाह केला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडितेने आठवडाभरापूर्वीच गाडगेनगर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदविली आहे. मात्र, याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात पोलिसांकडून दिरंगाई होत आहे. पोलीस कर्मचारी असलेल्या महिलेलाच जर न्यायासाठी भटकावे लागत असेल तर इतरांचे काय, अशी प्रतिक्रिया उमटत आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कार्यरत महिला पोलिसाने पहिल्या पतीला घटस्फोट दिल्यानंतर ती तिच्या १३ वर्षीय मुलीला घेऊन राहात होती. दरम्यान २८ एप्रिल २०१६ रोजी महिला पोलिसाची ओळख मंगेश माणिक शिरसाठ (२८) नामक तरूणाशी झाली. मंगेश हा जबलपूर येथे स्पेशल टास्क फोर्समध्ये कार्यरत असल्याचे महिलेला कळले. त्यानंतर दोघांचेही फोनवर बोलणे सुरू झाले. मंगेश अमरावतीमधील विद्युत नगराजवळील अभियंता कॉलनीत राहत असल्यामुळे तो वारंवार महिला पोलिसाच्या घरी भेटायला यायचा. अविवाहित असल्याची बतावणी करून मंगेशने तिच्याशी खासगी विवाह मंडळात विवाह केला. मात्र, ते विवाह प्रमाणपत्र खोटे असल्याचे पीडितेला काही दिवसांनी समजले. मंगेश हा वारंवार रजा घेऊन पीडितेला भेटायला यायचा आणि लैंगिक शोषण करायचा. जून २०१७ मध्ये मंगेश पीडितेच्या घरी आला असता त्याने पुन्हा तिच्यावर जबरीने लैंगिक अत्याचार केले आणि तो विवाहित असल्याचे पीडितेला सांगितले. केवळ शारीरिक संबधांसाठी लग्न केल्याचे पीडितेला कळताच तिने मंगेशच्या घरी जाऊन शहानिशा केली असता फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याबाबतची तक्रार तिने १० जुलै रोजी गाडगेनगर पोलिसांकडे दिली आहे. मात्र, अद्याप पोलिसांनी गुन्हा दाखल केला नसून प्रकरण विधी अधिकाऱ्यांकडे पाठविले आहे. महिलेने गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. तिच्या संमतीने संबंध प्रस्थापित झाले आहेत. केवळ तिची फसवणूक झाल्याचे या प्रकरणात निदर्शनास येत आहे. हे प्रकरण विधी अधिकाऱ्याकडे पाठविण्यात आले. - दत्तात्रय मंडलिक, पोलीस आयुक्त.