शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

बनावट फिटनेस प्रमाणपत्र तयार करणाऱ्या ड्रायव्हिंग स्कूलवर पोलिसांची धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:27 IST

अमरावती : वाहन परवाना बनविण्यासाठी बनावट फिटनेस सर्टीफिकेटचा वापर करणाऱ्या ज्ञानेश्वर ड्राईव्हिंग स्कूलमध्ये गाडगेनगर पोलिसांनी गुरुवारी दुपारी धाड टाकली. ...

अमरावती : वाहन परवाना बनविण्यासाठी बनावट फिटनेस सर्टीफिकेटचा वापर करणाऱ्या ज्ञानेश्वर ड्राईव्हिंग स्कूलमध्ये गाडगेनगर पोलिसांनी गुरुवारी दुपारी धाड टाकली. मालकासह एका कॅम्प्युट ऑपरेटरला ताब्यात घेतले. कार्यालयातील संगणकासह एक हजारावर बनावट दस्तावेज पोलिसांनी जप्त केले. या कारवाईमुळे प्रादेशिक परिवहन कार्यालय परिसरासह अन्य ड्राईव्हींग स्कूलचालकांमध्ये खळबळ उडाली. पाच महिन्यांपासून आरटीओ कार्यालय परिसरात हा गोरखधंदा सुरू होता.

प्रादेशिक परिवहन कार्यालयाजवळील आवारात रोशन मातकर यांच्या मालकीची इमारत असून, ज्ञानेश्वर ड्राईव्हिंग स्कूलचे संचालक योगेश प्रभुराव घुगे (रा. कॅम्प, सुंदरलाल चौक) यांनी ती इमारत भाडे तत्त्वावर घेतली आहे. घुगे यांनी सप्टेंबर २०२० पासून तेथे ज्ञानेश्वर ड्राईव्हिंग स्कूल सुरू केली. या ड्राईव्हिंग स्कुलच्या कार्यालयामार्फत वाहनधारकांना आरटीओ कार्यालयातून परवाना काढून देण्याचे काम केले जात होते. परंतु परवान्यासाठी वाहनचालकांना लागणारे फिटनेस सर्टिफिकेट ज्ञानेश्वर ड्राईव्हिंग स्कूलमध्ये तयार केले जात होते. या गोरखधंद्याचा गाडगेनगर पोलिसांनी गुरुवारी भंडाफोड केला. आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ४२०, ४१९, ४१७, ४६७, ४६८, ४७१, ४७२, ४७३ अन्वये गुन्हा नोंदविला. यासदर्भात आरटीओच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, होऊ शकला नाही.

बॉक्स

तक्रारीनंतर पोलिसांचा छापा

यशोदानगरातील रहिवासी नितीन भगवंत गाडे यांनी ज्ञानेश्वर ड्राईव्हिंग स्कूलमध्ये वाहन परवान्यासंबंधाने गेले होते. त्यावेळी त्यांनी वाहन परवान्याचे काम करून देण्यासाठी गाडेकडून तीन हजार रुपये घेतले. ज्ञानेश्वर ड्राईव्हिंग स्कूलमार्फत गाडे यांचे दस्तावेज तयार करून ते आरटीओकडे पाठविले. परंतु त्यातील फिटनेस सर्टिफिकेट बनावट असल्याचा संशय गाडे यांना आल्यामुळे त्यांनी गाडगेनगर पोलिसांत तक्रार नोंदविली. त्यानुसार २७ जानेवारी रोजी गाडगेनगरचे ठाणेदार आसाराम चोरमले, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र लेवटकर, पोलीस हवालदार आस्तिक देशमुख यांच्या पथकाने ज्ञानेश्वर ड्राईव्हिंग स्कूलवर छापा मारला. त्यावेळी बनावट फिटनेस सर्टिफिकेटचा पर्दाफाश झाला.

बॉक्स

बनावट शिक्के, संगणकासह दस्तावेज जप्त

वाहन परवान्यासाठी अधिकृत वैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत फिटनेस सर्टिफिकेट बनविणे आवश्यक असते. परंतु, या कार्यालयातच फिटनेस सर्टिफिकेट तयार करून ते वाहन परवान्याच्या दस्तावेजात जोडले जात होते. या सर्टिफिकेटवर डॉ. वैभव गरकळ (एमबीबीएस) यांच्या नावाच्या शिक्काचा वापरण्यात आला होता. त्यामुळे हा प्रकार फसवणुकीचा असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी ज्ञानेश्वर ड्राईव्हिंग स्कुलच्या कार्यालयातून चार शिक्के, एक संगणक व बनावट फिटनेस सर्टिफिकेटचे दस्तावेज जप्त केले.

कोट

एका इसमाच्या तक्रारीवरून सदर ड्रायव्हिंग स्कूलवर धाड टाकण्यात आली. बनावट दस्तावेज जप्त केले. याप्रकरणी दोघांना अटक केली असून, शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले जाईल.

- आसाराम चोरमले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गाडगेनगर ठाणे